एखादा नवा स्मार्टफोन खरेदी करायचा झाल्यास प्रत्येक युजर्स त्याच्या गरजेनुसार आणि शिखाला परवडेल असा फोन खरेदी करतो. असे मानले जाते की, भारतीय युजर्स स्मार्टफोनमधील बॅटरी, उत्तम कॅमेरा आणि डिस्प्लेला फार महत्व देतो. परंतु सायबर मीडिया रिसर्च (CMR) च्या नव्या रिसर्च नुसार, भारतीय ग्राहक स्मार्टफोन खरेदी करण्याच्या वेळी ऑडिओ क्वालिटी, कॅमेरा आणि बॅटरीला महत्व देतात. रिसर्च मध्ये असे समोर आले आहे की, चार पैकी एक युजर ऑडिओ क्वालिटी उत्तम असल्यास स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करतो. असे पहिल्यांदाच झाले आहे की, युजर्सची स्मार्टफोन खरेदी करण्याची विचारसरणीच बदलली आहे. खरेदीमध्ये ऑडिओ पॅटर्नला अधिक महत्व दिले जात आहे.
CMR चे हेड इंडस्ट्री कंसल्टिंग सत्य मोहंती यांच्या मते, उत्तम क्वालिटी असणारे स्मार्टफोनची वाढती मागणी म्हणजे लॉकडाऊन आहे. तर दुसऱ्या एका हेड यांनी म्हटले की, ओटीटी कंजंप्शन ते मोबाईल गेमिंग पर्यंत प्रत्येक गोष्टीत युजर्सला हाय क्वालिटी साउंड हवा असतो. याच कारणास्तव उत्तम साउंड क्वालिटी असणाऱ्या स्मार्टफोनची मागणी वाढली आहे.(Moto G9 अखेर भारतात लाँच, 5000mAh बॅटरी लाईफ असलेल्या या स्मार्टफोनच्या अन्य वैशिष्ट्यांविषयी जाणून घ्या सविस्तर)
भारतीय नागरिक ऑडिओ क्वालिटी पाहून स्मार्टफोन खरेदी करत आहेत. रिसर्चमध्ये उत्तम ऑडिओ क्वालिटीसाठी 100 पैकी 66 गुण मिळाले आहेत. तर बॅटरी लाईफसाठी 61 आणि कॅमेऱ्याला 60 गुण दिले गेले आहेत. 94 टक्के भारतीय पॉप्युलर ऑडिओचा आनंद ओटीटी प्लॅटफॉर्मवर गाणी ऐकून घेतात. तर 96 टक्के युजर्स हे चित्रपट, ओटीटी कंन्टेंट किंवा सोशल नेटवर्कवर युजर्स जनरेट कंन्टेंट पाहणे पसंद करतात. डिजिटल माध्यमांशी अधिक जवळीक असलेल्यांना लहान व्हिडिओ पाहणे आवडते. यांची संख्या 38 टक्के आहे. त्याचसोबत डिजिटल माध्यमांसोबत कमी वेळ घालवणाऱ्यांना मोठे व्हिडिओ पाहणे आवडते. या युजर्सची संख्या 23 टक्के आहे. प्रत्येक 8 पैकी 5 युजर्स हे 62 टक्के गेमिंगच्या वेळी उत्तम ऑडिओ पसंद करतात. परंतु 7 मधील 3 जण हे स्मार्टफोनच्या ऑडिओ संबंधित तक्रार करतात.