स्मार्टफोन निर्माता कंपनी मोटोरोला आपला नवा स्मार्टफोन Moto G9 भारतात लाँच केला आहे. ब्राझील मध्ये 4 महिन्यांपूर्वी लाँच झालेल्या या स्मार्टफोनची भारतामध्ये प्रचंड उत्सुकता होती. मात्र ही उत्सुकता आता संपली आहे. 5000mAh बॅटरी लाईफ (Battery Life) असलेला हा स्मार्टफोन अखेर भारतात लाँच झाला आहे. तशी या स्मार्टफोनची अनेक खास वैशिष्ट्ये आहेत. उत्कृष्ट बॅटरी लाईफसह कॅमेरा (Camera) आणि फास्ट चार्जिंगच्या (Fast Charging) बाबतीतही हा फोन अव्वल आहे. हा स्मार्टफोन ऑनलाईन शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर (Flipkart) विक्रीसाठी उपलब्ध केला जाईल.
या स्मार्टफोनची भारतातील किंमत 11,499 रुपये आहे. हा स्मार्टफोन फॉरेस्ट ग्रीन आणि सेफायर ब्लू अशा दोन रंगात उपलब्ध होईल. येत्या 31 ऑगस्टला दुपारी 12 वाजता याचा पहिला फ्लॅशसेल ठेवण्यात आला आहे. Moto G8 Power lite: भारतात लाँच झालेल्या मोटो G8 पावर लाइट स्मार्टफोन काय आहेत खास वैशिष्ट्ये
Moto G9 या स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, यात 6.5 इंचाची एचडी+मॅक्स व्हिजन टीएफटी डिस्प्ले देण्यात आली आहे. हा ऑक्टाकोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 662 प्रोसेसरवर चालतो. यात 4GB रॅम आणि 64GB चे स्टोरेज देण्यात आले आहे.
याच्या कॅमे-याविषयी बोलायचे झाले तर, तीन रियर कॅमेरा सेटअप असलेल्या या स्मार्टफोनमध्ये 48MP कॅमेरा देण्यात आला आहे. याचे अपर्चर F/1.7 आहे. हा क्वाड पिक्सेल टेक्नोलॉजीवर आधारित आहे. कॅमेरा सेटअपमध्ये 2MP चा डेप्थ सेंसर आहे आणि मॅक्रो लेन्ससह 2MP चा कॅमेरा आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये 8MP कॅमेरा देण्यात आला आहे.
यात 64GBचे स्टोरेज देण्यात आले असून ते मायक्रो एसडी कार्डच्या साहाय्याने 512GB पर्यंत वाढवू शकतो. याच्या कनेक्टिव्हिटीबाबत बोलायचे झाले तर, यात 4G VoLTE, Wifi 802.11ac, ब्लूटुथ 5.0, जीपीएस/एजीपीएस, NFC, FM रेडिओ, युएसबी टाईप-सी पोर्ट आणि 3.5MM हेडफोन जॅक देण्यात आला आहे. यात 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. हा 20 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. या स्मार्टफोनचे डायमेंशन 165.21x75.73x9.18 मिलीमीटर आहे.