जबरदस्त बॅटरी लाईफ आणि कॅमेरा फिचरसह भारतात Moto G8 Power lite स्मार्टफोन लाँच झाला. गुरुवारी म्हणजेच 21 मे ला हा स्मार्टफोन भारतात (India) लाँच झाला. या स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी लाईफ देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन रॉयल ब्लू आणि आर्कटिक ब्लू या 2 रंगात उपलब्ध होईल. हा डिवाईस 29 मे ला मोटोरोलाच्या अधिकृत वेबसाइटवर आणि शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध होईल. या स्मार्टफोनची किंमत 8,999 रुपये इतकी आहे.
या स्मार्टफोनच्या डिस्प्ले विषयी बोलायचे झाले तर यात 1600 इनटू 720 पिक्सेल रेजोल्यूशन असलेली 6.5 इंचाची एचडी प्लस IPS LCD डिस्प्ले देण्यात आली आहे.
हेदेखील वाचा- 10 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करा हे धमाकेदार स्मार्टफोन; दिग्गज कंपन्यांचाही यात समावेश
या फोनमध्ये 2.3 गिगाहट्ज क्लॉक स्पीडवाले ऑक्टाकोर प्रोसेसरसह मिडियाटेक Helio P35 चिपसेट दिले आहेत. यात आयएमजी पॉवर वीआर GE8320 जीपीयू 4GB रॅम दिली आहे. हा अॅनड्रॉईड 9.0 Pie वर चालतो. याचे फोन स्टोरेज मायक्रो एसडीच्या साहाय्याने 256GB वाढवू शकतो.
याच्या कॅमे-याविषयी बोलायचे झाले तर, हा स्मार्टफोन फ्लॅशलाईटसह F/2.0 अपर्चर 16MP चा प्रायमरी कॅमेरा सेंसर आहे. ज्याच्यासह f/2.4 अपर्चर चा 2MP मायक्रो लेन्स आणि f/2.4 अपर्चर 2MP चा डेप्थ सेंसर दिला गेला आहे. तर सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी मोटो G8 Power lite 8MP चा फ्रंट कॅमेरा दिला आहे.
या स्मार्टफोनच्या अन्य सुविधांविषयी बोलायचे झाले तर, यात ड्यूल 4G वीओएलटीई, वाई-फाई 802.11 बी / जी / एन, ब्लूटूथ 4.2, 3.5 मिमी हेड फोन्स जैक, एफएम रेडियो, फिंगरप्रिंट स्कैनर,जीपीएस प्लस ग्लोनास और माइक्रो यूएसबी पोर्ट आदि फिचर्स देण्यात आले आहेत.