Jodi Vance

गेल्या काही महिन्यांत तरुणांम्म्ध्ये हृदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) मृत्युच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. आता एक तरुण महिला अमेरिकन महिला बॉडीबिल्डरच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. अमेरिकेत एका खेळत सहभागी होत असलेल्या, 20 वर्षीय बॉडीबिल्डर जोडी व्हॅन्सला (Jodi Vance) हृदयविकाराचा झटका आला आणि त्यानंतर तिचा मृत्यू झाला. जोडीच्या मृत्यूची बातमी ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे, कारण तिने स्वतःला खूप तंदुरुस्त ठेवले होते. जोडीच्या मृत्यूनंतर, कुटुंबाने सांगितले की तिचा मृत्यू अचानक झाला. तिचा मृत्यू तीव्र डिहायड्रेशन (शरीरात पाण्याची कमतरता) मुळे झाल्याचे सांगण्यात आले.

हृदयविकाराचा झटका आल्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण तिला वाचवता आले नाही. जोडी ओहायोतील कोलंबस येथे झालेल्या अर्नोल्ड स्पोर्ट्स फेस्टिव्हलमध्ये सहभागी होत होती. न्यू यॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, ती या खेळात तिच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी गेली होती. यादरम्यान तिची प्रकृती बिघडली आणि तिला रुग्णालयात नेण्यात आले, जिथे तिला मृत घोषित करण्यात आले.

व्हॅन्सचे प्रशिक्षक जस्टिन मिहाली यांनी सोशल मीडियावर सांगितले की, व्हॅन्स जी मोठी चूक केली, ती तुम्ही करू नका. त्याला हलक्यात घेऊ नका. त्यांना शंका आहे की ती त्यांच्या नकळत ‘धोकादायक’ पदार्थ घेत होती, ज्यामुळे तिला डिहायड्रेट झाले. मिहाली म्हणाले की, जोडीने तिचे शरीर सुधारण्यासाठी दोन अतिशय धोकादायक पदार्थ वापरले. याबाबत तिचे कोच कुटुंबालाही माहिती नव्हती. यामुळेच तिला डिहायड्रेशन झाले असावे, कारण याशिवाय डिहायड्रेशन होण्याचे दुसरे कोणतेही कारण नव्हते. (हेही वाचा: Heart Attack While Playing Cricket: क्रिकेट खेळताना 24 वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; नाशिकमधील दहिवडी गावातील घटना)

व्हॅन्सचे प्रशिक्षक जस्टिन मिहाली  यांनी दिली माहिती-

दरम्यान, जोडी व्हॅन्सने 2024 च्या टेक्सासच्या एनपीसी बॅटलच्या महिला फिजिक विभागात तिसरे स्थान मिळवले होते. ती नियमितपणे तिच्या शरीरयष्टीचे, विचारांचे आणि कोट्सचे फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट करत असे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तिचे 8 हजारहून अधिक फॉलोअर्स होते.