Bhaiyyaji Joshi On Marathi Language Row: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) नेते सुरेश भैय्याजी जोशी यांनी गुरुवारी मराठी भाषेवरील त्यांच्या विधानावरून माघार घेत स्पष्टीकरण दिलं आहे. 'मुंबईची एक वेगळी भाषा आहे. घाटकोपर परिसराची भाषा गुजराती आहे. म्हणून जर तुम्ही मुंबईत राहत असाल तर तुम्हाला मराठी शिकण्याची गरज नाही,' असे आरएसएस नेते बुधवारी मुंबईतील घाटकोपर येथे एका कार्यक्रमात म्हणाले होते. तथापी, आता मराठी भाषेवरील विधानावर स्पष्टीकरण देताना त्यांनी म्हटलं आहे की, 'मराठी ही महाराष्ट्राची आणि मुंबईची भाषा आहे. मुंबई ही महाराष्ट्राचा एक भाग आहे. याबद्दल कोणताही गोंधळ नसावा. भारतात, वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक एकत्र राहतात आणि ही देशाची खासियत आहे. मुंबईत, देशाच्या अनेक भागातील लोक राहतात आणि आम्हाला वाटते की त्यांनी मराठी शिकावे आणि बोलावे.
VIDEO | Here's what RSS leader Suresh Bhaiyyaji Joshi said when asked about his remarks on Marathi language.
"Yesterday, at an event in Ghatkopar, I made some remarks which I believe are being misinterpreted. Marathi is the language of Maharashtra and Marathi is also a language… pic.twitter.com/i62Kc24PNu
— Press Trust of India (@PTI_News) March 6, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)