Suicide प्रतिकात्मक प्रतिमा (फोटो सौजन्य - Pixabay)

Haryana Shocker: सोनीपतमध्ये एका विद्यार्थीनीने वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Express) समोर उडी मारून आत्महत्या (Suicide) केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. गणौर आणि भोडवाल माजरी रेल्वे स्थानकांदरम्यान ही घटना घडली. मृत मुलीच्या वडिलांनी गावातील दोन तरुणांवर आणि एका पुजाऱ्यावर बलात्कार (Rape) करून तिला आत्महत्या करण्यास भाग पाडल्याचा आरोप केला आहे. या घटनेची माहिती मिळताच जीआरपी पोलिस स्टेशन घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पीडित मुलीचा मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी सोनीपत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवला.

आरोपींविरोधात गुन्हा दाखल -

मिळालेल्या माहितीनुसार, मृताच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तीन आरोपींविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. तक्रारीत मृताच्या वडिलांनी म्हटले आहे की, त्यांची मुलगी बारावीची विद्यार्थिनी होती. गेल्या अनेक दिवसांपासून त्याच गावातील तुषार आणि कमल यांनी त्यांच्या मुलीला त्यांच्या जाळ्यात ओढले होते. त्यांच्या मुलीने यापूर्वीही याबद्दल त्यांच्याकडे तक्रार केली होती. 4 मार्च रोजी तुषार आणि कमल यांनी त्याच्या मुलीला आमिष दाखवून गावातील मंदिरात पुजारी मनजीतकडे नेल्याचा आरोप आहे. (हेही वाचा -Bandra Gang Rape Case: वांद्रे मध्ये 18 वर्षीय मुलीला गुंगीचं औषध देऊन सामुहिक बलात्कार; एक आरोपी फरार दुसरा अटकेत)

दरम्यान, 5 मार्च रोजी पुजारी मनजीतने त्यांना फोनवरून सांगितले की त्यांच्या मुलीने ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केली आहे. तिन्ही आरोपींनी त्यांच्या मुलीवर बलात्कार केल्याचा संशय वडिलांनी व्यक्त केला असून त्यामुळे मुलीने हे टोकाचे पाऊल उचलल्याचं पीडितेच्या वडिलांनी सांगितलं आहे. (वाचा: Mumbai Shocker: मैत्रीणीचा मॉर्फ व्हिडिओ सोशल मीडियावर केले व्हायरल, बारावीच्या २ विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल .)

मुख्य आरोपीला अटक -

जीआरपी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक महाबीर तोमर यांनी सांगितले की, या प्रकरणात, मृत मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून, जीआरपी पोलिस ठाण्याने आरोपी तुषार, कमल आणि मनजीत यांच्याविरुद्ध पॉक्सो कायद्याअंतर्गत अपहरण आणि एखाद्याला आत्महत्या करण्यास भाग पाडणे या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. कारवाई करत पोलिसांनी मुख्य आरोपी तुषारला अटक केली आहे.