Close
Advertisement
 
रविवार, मार्च 09, 2025
ताज्या बातम्या
14 minutes ago

Mumbai: 'माझी आई खूप तुटली आहे...', असा संदेश लिहून एका व्यक्तीने हॉटेलच्या खोलीत केली आत्महत्या

मुंबईत आत्महत्येची एक घटना समोर आली आहे. 41 वर्षीय व्यक्तीने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या कंपनीच्या वेबसाइटवर आपल्या कुटुंबाच्या नावाने अंतिम संदेश लिहून आत्महत्या केली. त्या व्यक्तीने आपल्या शेवटच्या मेसेजमध्ये त्याने आपल्या मृत्यूसाठी पत्नी आणि तिच्या नातेवाईकाला जबाबदार धरलं होतं. निशांत त्रिपाठी असे मृताचे नाव आहे. मृताचे कुटुंब कानपूरयेथे राहत असून तो अॅनिमेशन इंडस्ट्रीत काम करत होता.

राष्ट्रीय Shreya Varke | Mar 07, 2025 10:55 AM IST
A+
A-
Suicide प्रतिकात्मक प्रतिमा (फोटो सौजन्य - संपादित प्रतिमा)

Mumbai: मुंबईत आत्महत्येची एक घटना समोर आली आहे. 41 वर्षीय व्यक्तीने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या कंपनीच्या वेबसाइटवर आपल्या कुटुंबाच्या नावाने अंतिम संदेश लिहून आत्महत्या केली. त्या व्यक्तीने आपल्या शेवटच्या मेसेजमध्ये त्याने आपल्या मृत्यूसाठी पत्नी आणि तिच्या नातेवाईकाला जबाबदार धरलं होतं. निशांत त्रिपाठी असे मृताचे नाव आहे. मृताचे कुटुंब कानपूरयेथे राहत असून तो अॅनिमेशन इंडस्ट्रीत काम करत होता. निशांतने 28 फेब्रुवारी रोजी आत्महत्या केली होती. त्यानंतर कुटुंबीयांनी एफआयआर दाखल केला. याची माहिती पोलिसांनी 6 मार्च रोजी दिली. निशांत त्रिपाठी यांनी मुंबईतील विलेपार्ले येथील सहारा हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निशांतने आत्महत्येच्या तीन दिवस आधी हॉटेलमध्ये रूम बुक केली होती. ज्या दिवशी निशांतने आत्महत्या केली, त्या दिवशी त्याने आपल्या खोलीबाहेर 'डू नॉट डिस्टर्ब' असा फलकही लावला होता.

मात्र, बराच वेळ त्याने खोलीचा दरवाजा न उघडल्याने हॉटेलकर्मचाऱ्यांनी दुसऱ्या चावीने खोलीचा दरवाजा उघडला असता निशांतचा मृतदेह खोलीत लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. तपासादरम्यान पोलिसांना एक सुसाईड नोटही सापडली. ही सुसाईड नोट निशांतने मृत्यूपूर्वी आपल्या कंपनीच्या वेबसाईटवर अपलोड केली होती. त्याने आपल्या मृत्यूला पत्नी आणि मावशीला जबाबदार धरले.

दरम्यान, या घटनेनंतर मृत निशांतच्या आईने मुंबई विमानतळ पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. निशांतची पत्नी अपूर्वा पारिख आणि तिची मावशी प्रार्थना मिश्रा यांच्याविरोधात बीएनएसकलम 108अन्वये तक्रार दाखल केली आहे.


Show Full Article Share Now