महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असताना आता मुंबई च्या वांद्रे (Bandra) मध्ये अजून एक बलात्काराची (Rape Case) घटना समोर आली आहे. 18 वर्षीय मुलीवर बलात्कार झाला आहे. हा सामुहिक बलात्काराचा (Gang Rape) प्रकार असून यामध्ये एक 31 वर्षीय आरोपी अटकेमध्ये आहे तर दुसरा आरोपी अजूनही फरार आहे. FPJ च्या सूत्रांच्या माहितीनुसार, 'पीडीतेला तिच्या नातेवाईकांकडे घेऊन जाण्यासाठी तिला कार मध्ये बसवले. तिला पाण्याच्या बाटलीमधून काही गुंगीचे पदार्थ देऊन संधीचा फायदा घेतला. हा प्रकरणी Nirmal Nagar Police Station मध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तर आरोपींचा शोध सुरू आहे. अब्दुल मोतिन खान चा शोध सुरू आहे.
तरूणीने सारा प्रकार घरी सांगितल्यानंतर तिच्या कुटुंबियांनी पोलिसांत धाव घेतली. तरूणीची त्यानंतर वैद्यकीय तपासणी झाली आहे. यामध्ये सामुहिक बलात्कार झाल्याचं समोर आलं आहे. नक्की वाचा: Mumbai Shocker: मैत्रीणीचा मॉर्फ व्हिडिओ सोशल मीडियावर केले व्हायरल, बारावीच्या २ विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल .
काही दिवसांपूर्वीच सीएसएमटी स्थानकाजवळ देखील एका तरूणीवर टॅक्सीस्टॅन्ड जवळ बलात्कार झाल्याची बाब समोर आली आहे त्यानंतर या घटनेने मुंबई शहर हादरलं आहे. सध्या सर्वत्र नवरात्र उत्सव सुरू आहे. अशावेळी अनेक भागात गजबज असतानाही अशा प्रकारच्या घटना समोर येत असल्याने आता मुंबईमध्ये महिला सुरक्षित आहेत का? असा प्रश्न समोर आला आहे.