महाराष्ट्रात महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. चिमुकलींवरील लैंगिक अत्याचारांच्या प्रकरणानंतर आता मुंबई, पुण्यात सामुहिक बलात्काराचे (Gang Rape) प्रकार समोर आले आहेत. 22 सप्टेंबरच्या रात्री मुंबई मध्ये सीएसएमटी स्थानकाबाहेर (CSMT Station) 29 वर्षीय मुलीवर सामुहिक बलात्कार झाल्याचं समोर आलं आहे. पीडीतेच्या FIR नुसार, 2 अज्ञातांनी तिच्यावर बलात्कार केला आहे. धमकी देत तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचं समोर आलं आहे. स्टेशन बाहेर ही मुलगी एकटी असताना तिच्यावर हा अतिप्रसंग झाल्याचं समोर आलं आहे.
ABP च्या रिपोर्ट नुसार, आरोपींनी पीडीतेला टॅक्सी स्टॅन्ड जवळ नेले. तिच्या तोंडात कापडाचा बोळा टाकून तिचा आवाज बंद केला आणि तिच्यावर दोघांनी आळीपाळीने अत्याचार केला. या घटनेनंतर पीडीतेने तेथून पळ काढला. नंतर पोलिस स्टेशन मध्ये जाऊन तिने जबाब नोंदवला आहे.
दरम्यान या प्रकाराची आधी नोंद सीएसएमटी लोहमार्ग पोलिस स्टेशन मध्ये झाली नंतर हे प्रकरण माता रमाबाई मार्ग पोलिस स्टेशन मध्ये वर्ग करण्यात आली. सध्या पोलिस आरोपींचा शोध घेत असून पुरावे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्या नवी मुंबईतील मीनाताई ठाकरे रुग्णालयात महिलेवर उपचार सुरु आहेत. Mumbai Shocker: लेकीच्या अपहरणाची तक्रार घेऊन आला बाप अन त्याच्याच कूकर्माचा झाला उलगडा; पोटच्या लेकीवर 5 वर्ष करत होता लैंगिक अत्याचार .
मुंबई प्रमाणेच पुण्यात कोंढव्यातील बोपदेव घाटात मित्रासाेबत फिरायला गेलेल्या महाविद्यालयीन तरुणीवर देखील सामुहिक बलात्कार झाल्याची एक घटना ताजी आहे. रात्री 11 च्या सुमारास तरुणी अणि तिचा मित्र घाटात गप्पा मारत थांबले हाेते. त्यावेळी दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी त्यांना धमकावले. तरुणीला धमकावून तिघांनी तिच्यावर बलात्कार केला.