Mumbai Shocker: मैत्रीणीचा मॉर्फ व्हिडिओ सोशल मीडियावर केले व्हायरल, बारावीच्या २ विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल

पनवेल येथे संतापजनक घटना घडली आहे. आपल्या वर्ग मैत्रिणीचे अश्लिल फोटो सोशल मीडियावर शेअर केल्या प्रकरणी तालुका पोलिसांनी १२ वीच्या दोन विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ३ ऑक्टोबर रोजी उघडतीस आली.

Mumbai Shocker: मैत्रीणीचा मॉर्फ व्हिडिओ सोशल मीडियावर केले व्हायरल, बारावीच्या २ विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल
Rape

Mumbai Shocker: पनवेल येथे संतापजनक घटना घडली आहे. आपल्या वर्ग मैत्रिणीचे अश्लिल फोटो सोशल मीडियावर शेअर केल्या प्रकरणी तालुका पोलिसांनी १२ वीच्या दोन विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ३ ऑक्टोबर रोजी उघडतीस आली. जेव्हा पीडितेच्या दुसऱ्या वर्गमित्राने तिचा व्हायरल झालेल्या चित्राबद्दल सांगितले. या घटनेनंतर तरुणी नैराश्यात गेली. पालकांना या बाबात माहिती देत पोलिसांकडे तक्रार दाखल केली. (हेही वाचा- लैंगिक संबंध नकारल्याने शिक्षकाचा अश्लिल व्हिडिओ सोशल मीडियावर केला प्रसारित, चार विद्यार्थ्यांना अटक)

मिळालेल्या माहितीनुसार,  आपल्याच एका वर्गमैत्रीणीचे अश्लिल नग्न फोटा मॉर्फ करून इंस्टाग्रामवर शेअर केल्याचा दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता आणि लैंगिक अपराधांपासून मुलांचे संरक्षण कायद्याच्या संंबंधित कलमांतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला. आरोपांमध्ये लैंगिक छळ, मानहानी आणि अल्पवयीन व्यक्तीच्या प्रतिष्ठेचा अपमान करणे यांचा समावेश आहे.

पनवेल तालुका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरिक्षक अनिक पाटील यांनी सांगितले की,"दोन्ही आरोपी मुले पनवेल तालुक्यातील करंजाडे आणि नेरे गावातील रहिवासी आहेत. एका मुलाने अल्पवयीन मुलीचा फोटो एडिट करून इन्स्टाग्रामवर पोस्ट केला, तर दुसऱ्याने सोशल मीडियावर शेअर केला.

आरोपींमध्ये एका १७ वर्षाचा (अल्पवयीन) तर दुसरा १८ वर्षाचा आहे. तरीही पोलिस या प्रकरणी वयाची पडताळणी सुरु करत आहे. आरोपी मुलांना अटक करण्यात आलेली नसून, पोलिस त्यांच्याविरुद्ध बाल न्याय मंडळात आरोपपत्र दाखल करण्याच्या तयारीत आहेत. या घटनेनंतर पीडितेच्या पालकांनी संताप व्यक्त केला आहे.

(The above story first appeared on LatestLY on Oct 06, 2024 02:48 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).