young woman attempted suicide | Pixabay.com

मुंबई मधील वर्दळीच्या असलेल्या सीएसएमटी रेल्वे स्थानकावर (CSMT Railway Station) आज एका तरूणीने आत्महत्येचा (Suicide) प्रयत्न केला आहे. रेल्वे स्थानकातील बाथरूम मध्ये या तरूणीने हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची बाब समोर आली आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार, बाथरूम मधील फरशीवर तिने रक्ताने 'I am Sorry' लिहलं होतं. त्यानंतर ती कोसळून पडलेल्या अवस्थेत आढळली.

तरूणीला जमिनीवर कोसळलेले पाहून रेल्वे स्थानकात असलेल्या कर्मचारी वर्गाची, सफाई कामगारांची धावाधाव झाली. ही घटना दुपारी 12-2 दरम्यान घडली आहे. बेशुद्ध अवस्थेमध्ये असलेल्या तरूणीला तातडीने नजिकच्या रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. दरम्यान या तरूणीची ओळख अद्याप समोर आली नसली तरीही ही विशीतली तरूणी असल्याचा अंदाज आहे.

तरूणीची ओळख पटवण्याचा आणि तिने आत्महत्या करण्याचा निर्णय नेमका का घेतला? याचा तपास सध्या सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.  भारतात आत्महत्येचा प्रयत्न हा कलम 309 , IPC अंतर्गत दंडनीय गुन्हा आहे.

Suicide Prevention and Mental Health Helpline Numbers:

Tele Manas (Ministry of Health) – 14416 or 1800 891 4416; NIMHANS – 91 80 26995000 /5100 /5200 /5300 /5400; Arpita Suicide Prevention Helpline – 080-23655557; iCALL – 022-25521111 and 9152987821; Peak Mind – 080-456 87786; Vandrevala Foundation – 9999 666 555; COOJ Mental Health Foundation (COOJ) – 0832-2252525.