Representative Image (Photo Credits: Pixabay)

राज्यात पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकावर घडलेली बलात्काराची (Rape) घटना अजूनही ताजी असताना आता, मुंबईतील जोगेश्वरी (Jogeshwari) परिसरात एका 12 वर्षांच्या मुलीवर पाच जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर अली आहे. ही मुलगी दादर रेल्वे स्थानकावर सापडल्यानंतर ही घटना उघडकीस आली. 26 फेब्रुवारी रोजी संजयनगर परिसरात हा गुन्हा घडला. वृत्तानुसार, एका आरोपीने पीडितेला एका खोलीत नेले, जिथे इतर चार आरोपी आधीच उपस्थित होते. सर्व आरोपींनी पीडितेवर बलात्कार केला आणि नंतर तिला दादर रेल्वे स्थानकाजवळ सोडून दिले.

माहितीनुसार, अल्पवयीन मुलगी जोगेश्वरी पूर्व येथे राहत होती, परंतु घरी काही वाद झाल्यामुळे ती घराबाहेर पडली आणि स्टेशनकडे निघून गेली. स्टेशनवर तिची एका ओळखीच्या व्यक्तीशी भेट झाली आणि नंतर त्याने तिला एका खोलीत नेले. या ठिकाणी पाचही आरोपींनी पीडितेवर लैंगिक अत्याचार केले आणि तिला दादर रेल्वे स्थानकाजवळ सोडून दिले. आता पोलिसांनी पाचही आरोपींना अटक केली आहे. यातील दोघे दादर रेल्वे स्थानकावर सापडले. (हेही वाचा: Aalandi Shocker: आळंदी मध्ये संगीत शिक्षकाकडून अल्पवयीय मुलाकडे शरीरसुखाची मागणी)

27 फेब्रुवारी रोजी, पीडित मुलगी प्लॅटफॉर्म 12 वर आढळली आणि रेल्वे पोलिसांनी तिला त्रासलेल्या अवस्थेत पाहिले. त्यानंतर अल्पवयीन मुलीला जोगेश्वरी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) आणि लैंगिक अत्याचाराविरुद्ध इतर कायदेशीर खटल्यांच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला. या प्रकरणी तपास सुरु असून, पीडितेला न्याय देण्यासाठी पोलीस सर्व पुरावे गोळा करत आहेत.