Maharashtra Government | (File Image)

महाराष्ट्रामध्ये अजून 8 आयएएस अधिकार्‍यांच्या बदल्या जाहीर करण्यात आल्या आहे. MMRDAचे सहआयुक्त राधाविनोद शर्मा यांना आता मीर भाईंदर महानगरपालिकेच्या आयुक्तपद देण्यात आलं आहे. तर उद्योग संचालनालयाचे अतिरिक्त विकास अधिकारी एम जे प्रदीप चंद्रेन यांची बदली पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी करण्यात आली आहे. वैदेही रानडे यांना आता रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.फडणवीस सरकार मध्ये मागील काही महिन्यांत देखील आयएएस अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या.

महाराष्ट्र सरकार कडून आठ दिवसांपूर्वीच 7 वरिष्ठ आयएएस अधिकार्‍यांचे खांदेपालट करण्यात आले होते. त्यामध्ये अअता अजून 8 जणांची भर पडली आहे.

आज आदेशावरून ज्या आयएएस अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत त्यामध्ये राधाविनोद शर्मा, एम.जे. प्रदीप चंद्रेन, बाबासाहेब बेलदार, जगदीश मिनियार, गोपीचंद कदम, वैदेही रानडे, डॉ. अर्जुन चिखले आणि डॉ. पंकज आशिया यांचा समावेश आहे. नक्की वाचा: महाराष्ट्र सरकार कडून 12 IAS अधिकार्‍यांच्या बदल्या; पूजा खेडकरमुळे चर्चेत आलेले डॉ. सुहास दिवसे यांना पदोन्नती .

बाबासाहेब बेलदार आता अल्पसंख्याक विकास आयुक्त, छत्रपती संभाजीनगर ची जबाबदारी सांभळतील. जगदीश मिनियार मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जालना असतील. गोपीचंद कदम आता अतिरिक्त आदिवासी आयुक्त, ठाणे असतील.  डॉ. अर्जुन चिखले फी नियामक प्राधिकरण, मुंबई, सचिव पदी आले आहेत.  डॉ. पंकज आशिया हे  अहिल्यानगर येथील जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त झाले आहेत.