Photo Credit- X

जळगाव (Jalgaon) मधील (Yaval) तालुक्यामध्ये 7 वर्षाचं बाळ बिबट्याने पळवून त्याचे लचके तोडल्याचा प्रकार समोर आला आहे. आईच्या हातातून बाळाला हिसकावून नेत त्याच्यावर हल्ला केल्याचं वृत्त समोर आलं आहे. आपल्या बाळाची सुटका व्हावी म्हणून आई ओरडत राहिली मात्र दुर्देवाने ती बाळाला वाचवू शकली नाही. आईच्या डोळ्यादेखत बिबट्याने त्याचे लचके तोडले. बिबट्याची दहशत आता गावकर्‍यांच्या मनात बसली आहे.

यावल मध्ये जळगाव वनविभागाच्या हद्दीमध्ये दुपारी केशा हे 7 वर्षाचं बाळ आई सोबत शिवारात जाण्यासाठी निघालं होतं. अचानक शेतात दबा धरून बसलेला बिबट्या आला आणि त्याने आईवर झडप घातली. आईच्या हाताला असलेलं बाळ घेऊन बिबट्या शेतात गेला. आपल्या बाळाला वाचवण्यासाठी आईने अनेक प्रयत्न केले. बिबट्याला हुसकावण्याचे प्रयत्न केले पण तिच्या डोळ्यादेखतच त्याचा मृत्यू झाला. या घटनेने आईला जबर धक्का बसला आहे. नक्की वाचा: Leopard Attack In Ambegaon: आंबेगावात बिबट्याचा 3 मोटारसायकलस्वारांवर हल्ला; 17 वर्षांची मुलगी जखमी .

दरम्यान या हृद्यद्रावक घटनेनंतर यावल वनविभागाचे उपवनसंरक्षक जमीर शेख, चोपड्याचे वनसंरक्षक प्रथमेश हडपे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट दिली आहे. सध्या ग्रामस्थांकडून बिबट्याला जेराबंद करून जंगलात सोडण्याची मागणी केली जात आहे. नागरिकांना, शेतकर्‍यांना दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. चोपडा विधानसभेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी आज विधानसभेमध्ये या कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी अधिवेशनादरम्यान केली आहे.