
IND vs BAN 2nd Match: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये भारत आणि बांगलादेश (IND vs BAN) यांच्यात दुबईमध्ये सामना खेळला जात आहे. या सामन्यात बांगलादेशचा कर्णधार नझमुल हसन शांतोने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो चुकीचा ठरला. बांगलादेशने फक्त 35 धावांत पाच विकेट गमावल्या. सुरुवातीला भारतीय गोलंदाजांनी विरोधी फलंदाजांना मोकळेपणाने फटके खेळू दिले नाहीत. या सामन्यात शमीने शानदार गोलंदाजी केली आहे आणि एक खास विक्रम रचला आहे. (हे देखील वाचा: IND vs BAN 2nd Match Live Score Update: बांगलादेशने भारतासमोर ठेवले 229 धावांचे लक्ष्य, हरदॉयने झळकावले शतक; शमीने घेतल्या पाच विकेट)
मोहम्मद शमीने केला चमत्कार
मोहम्मद शमीने नेहमीच आयसीसी स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केली आहे आणि त्याची झलक आपल्याला 2023च्या एकदिवसीय विश्वचषकात दिसली आहे. आता बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात तीन विकेट्स घेत त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 200 विकेट्स पूर्ण केल्या आहेत. तो एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात सर्वात कमी चेंडूत 200 बळी घेणारा गोलंदाज बनला आहे आणि त्याने मिशेल स्टार्कचा विश्वविक्रम मोडला आहे.
2⃣0⃣0⃣ wickets and counting!
Mohd. Shami becomes the fastest bowler for India to scalp 200 ODI wickets! 🫡
Follow the Match ▶️ https://t.co/ggnxmdG0VK#TeamIndia | #BANvIND | #ChampionsTrophy | @MdShami11 pic.twitter.com/CqLyuQPh3X
— BCCI (@BCCI) February 20, 2025
शमीने 200 एकदिवसीय विकेट्स पूर्ण करण्यासाठी 5126 चेंडू घेतले आहेत. तर स्टार्कने हे 5240 चेंडूंमध्ये केले. आता शमीने सर्वात कमी चेंडूत 200 एकदिवसीय विकेट्स घेण्याच्या बाबतीत जगभरातील सर्व गोलंदाजांना मागे टाकले आहे आणि तो पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे.
200 एकदिवसीय विकेट्स पूर्ण करण्यासाठी सर्वात कमी चेंडूंची संख्या
मोहम्मद शमी - 5126
मिचेल स्टार्क - 5240
सकलेन मुश्ताक - 5451
ब्रेट ली - 5640
ट्रेंट बोल्ट-6783
सकलेन मुश्ताकची बरोबरी
मोहम्मद शमीने त्याच्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये 104 सामन्यांमध्ये 200 विकेट्स घेतल्या आहेत. तो सर्वात कमी सामन्यांमध्ये 200 बळी घेणारा संयुक्त दुसरा गोलंदाज ठरला. त्याने सकलेन मुश्ताकची बरोबरी केली आहे. या दोन्ही गोलंदाजांनी 104-104 सामन्यांमध्ये 200 विकेट्स पूर्ण केल्या आहेत. तर मिचेल स्टार्क पहिल्या क्रमांकावर आहे. स्टार्कने 102 सामन्यांमध्ये 200 विकेट्स घेतल्या.