IND vs BAN (Photo Credit - X)

India National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team ICC Champions Trophy 2025: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा दुसरा सामना आज म्हणजेच 20 फेब्रुवारी रोजी भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ (IND vs BAN) यांच्यात दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर (Dubai International Cricket Stadium, Dubai) खेळला जात आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दोन्ही संघांचा हा पहिलाच सामना आहे. या मालिकेत टीम इंडियाचे नेतृत्व रोहित शर्मा करत आहे. दुसरीकडे, बांगलादेशची कमान नजमुल हुसेन शांतो यांच्याकडे आहे. दरम्यान, बांगलादेशचा कर्णधार नझमुल हुसेन शांतोने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत भारतासमोर 229 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या बांगलादेशची सुरुवात वाईट झाली. त्यांनी फक्त 35 धावांत 5 विकेट गमावल्या होत्या, पण त्यानंतर तौहिद हृदयॉयचे शतक आणि झाकीर अलीच्या अर्धशतकाने संघाचा सन्मान वाचवला. तौहीदने 100 धावा आणि झाकीरने 68 धावा केल्या. बांगलादेशचा स्कोर 10 विकेट गमावून 228 धावांपर्यत पोहचवला. भारताकडून मोहम्मद शमीने पाच विकेट्स घेतल्या. तर हर्षित राणाने तीन विकेट्स घेतल्या. आणि अक्षर पटेलने 2 विकेट घेतल्या.

पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव

बांगलादेश (प्लेइंग इलेव्हन): तनझिद हसन, सौम्या सरकार, नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), तौहीद ह्रदोय, मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), मेहिदी हसन मिराझ, जाकेर अली, रिशाद हुसेन, तंजीम हसन साकिब, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान