कुलदीप यादव (Photo Credit: Getty)

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर चांगली कामगिरी करणारा भारतीय संघ आता मायदेशात इंग्लंडसोबत भिडणार आहे. भारत आणि इंग्लंड (IND Vs ENG) यांच्यात चार सामन्यांची कसोटी मालिका (Test Serie) खेळण्यात येणार आहे. ही मालिका फेब्रुवारी- मार्च दरम्यान खेळली जाणार आहे. या मालिकेत भारताचा फिरकीपटू गोलंदाज कुलदीप यादवला (Kuldeep Yadav) संधी मिळण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी मालिकेत कुलदीप यादवची निवड झाली होती. मात्र, त्याला एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नव्हती. यातच बीसीसीआय आज एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओत अजिंक्य रहाणेनी कुलदीप यादवची प्रशांसा केली आहे. तसेच तुझी वेळ नक्की येईल, प्रयत्न करत राहा, असेही अजिंक्य रहाणे म्हणाला आहे.

भारतीय संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण म्हणाले आहेत की, कुलदीप भारतात खेळू शकतो. कुलदीप ऑस्ट्रेलियामध्ये खेळला नाही. कारण, संघ व्यवस्थापनाने धावपट्टीनुसार खेळाडूची निवड करण्याचे धोरण अवलंबले होते. सध्या कुलदीप खूप मेहनत घेत आहे. त्याने आतापर्यंत चांगली कामगिरी करून दाखवली आहे. कुलदीप नेट्समध्ये चांगली फलंदाजी करत आहे. जेव्हा त्याला संधी मिळेल, तेव्हा तो स्वत:ला सिद्ध करून दाखवेल. इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत तो चांगली कामगिरी करेल. हे देखील वाचा- IPL 2021: आयपीएलमधून भारताचे 3 तडाखेबाज फलंदाज झाले मालामाल, पार केला 100 कोटींच्या कमाईचा टप्पा

भारताकडून खेळताना कुलदीपने नेहमी चांगले प्रदर्शन करून दाखवले आहे. टी-20 सामन्यात त्याला संधी मिळाली होती. त्यावेळी त्याने चांगली गोलंदाजी केली होती. यामुळे भारतीय क्रिकेट संघातील प्रत्येक खेळाडूला माहिती आहे की त्याची वेळ नक्की येईल, असेही अरुण म्हणाले आहेत.