इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या मोसमातील 19 वा सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जात आहे. दोन्ही संघ सध्या पराभवाच्या वाटेवर आहेत. हा सामना जिंकणे दिल्ली कॅपिटल्ससाठी खूप महत्त्वाचे आहे. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत होणार आहे. दरम्यान, दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला उतरलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाला पहिला मोठा धक्का बसला. सलामीवीर फाफ डू प्लेसिस 22 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ स्कोअर 42/1 आहे.
Match 20. WICKET! 4.4: Faf Du Plessis 22(16) ct Aman Khan b Mitchell Marsh, Royal Challengers Bangalore 42/1 https://t.co/xb3InbFbrg #TATAIPL #RCBvDC #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) April 15, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)