Credit-(X,@News1IndiaTweet)

Viral Video: पबजी गेम खेळून भारतातील तरुणाच्या प्रेमात पडलेली सीमा हैदर सध्या प्रेग्नेंट आहे.  सीमा हैदरचा बेबी शॉवर सोहळा रविवारी पार पडला. सर्वोच्च न्यायालयाचे वकील ए. पी. सिंह यांच्यासह शेकडो लोक या कार्यक्रमाला उपस्थित होते. सीमा हैदर गेल्या दोन वर्षांपासून सचिन मीनासोबत रबूपुरा येथे राहत आहे. ती पाकिस्तानातून नेपाळमार्गे भारतात आली होती. सीमाला आधीच चार मुले आहेत आणि आता ती सचिनसोबत पाचव्या मुलाची अपेक्षा करत होती. अखेर आनंदाची बातमी समोर आली असून सीमाचा डोहाळ जेवण सोहळा संपन्न झाला आहे. सीमा हैदर भारतात आल्यापासून ती नेहमीच चर्चेत असते. यावेळी महिलांनीही या कार्यक्रमात सहभाग घेतला आणि पारंपरिक गाणी गायली गेली. सीमा हैदरचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर हँडल @News1IndiaTweet शेअर करण्यात आला आहे.

येथे पाहा व्हिडीओ: 

सीमा ही पाकिस्तानची होती. तिथे तिला4 मुले आणि नवरा होता. पण पबजी खेळत असताना ती भारतातील सचिनच्या प्रेमात पडली आणि सर्वकाही सोडून भारतात येऊन प्रियकराशी लग्न केले. तेव्हापासून ती भारतातच आहे.