RCB vs GG, WPL 2025 12th Match: महिला प्रीमियर लीगचा 12 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू महिला आणि गुजरात जायंट्स महिला यांच्यात बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जात आहे. यावेळी गुजरात जायंट्सचे नेतृत्व अ‍ॅशले गार्डनर करत आहे. तर, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची कमान स्मृती मानधनाच्या खांद्यावर आहे. दरम्यान, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या आरसीबी संघाने निर्धारित 20 षटकांत सात गडी गमावून 125 धावा केल्या. आरसीबीकडून कनिका आहुजाने 33 धावांची शानदार खेळी केली.  दुसरीकडे, गुजरात जायंट्स संघाकडून तनुजा कंवर आणि डिआंड्रा डॉटिन यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. तसेच, अ‍ॅशले गार्डनर आणि काशवी गौतम यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. हा सामना जिंकण्यासाठी गुजरात जायंट्स संघाला 20 षटकांत 126 धावा कराव्या लागतील.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)