Rock Blasting Accident | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

विहिरीत (Well) खडक फोडण्यासाठी पेरण्यात आलेल्या सुरुंगाचा स्फोट (Rock Blasting Accident) होऊन प्रभाकर टेकाम नावाचा एक मजूर ठार (Laborer Kill) झाला आहे, तर विहीर मालकाचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना वाशीम (Washim) जिल्ह्यातील कारंजा लाड (Karanja Lad) तालुक्यातील एकांबा गावात ज्ञानेश्वर घागरे यांच्या शेतात घडली. प्राप्त माहितीनुसार, ठाकरे नामक शेतकऱ्याच्या शेतात मनरेगा (MGNREGA) म्हणजेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार गॅरंटी अधिनियम अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या रोजगार हमी योजनेतून विहीरीचे खोदकाम सुरु होते. दरम्यान, विहीरीमध्ये विशिष्ट फुटांवर खडक लागला. तो फोडण्यासाठी सुरुंग उडविण्यात येत होता. नेहमीप्रमाणे सुरुंग उडाला पण त्यातील काही प्रति फुटल्याच नाहीत. त्यामुळे सोनेगाव (मुस्तफा) येथीर रहिवासी असलेला प्रभाकर टेकाम हा मजूर ते पाहणयासाठी जेसबी बकेटच्या सहाय्याने विहीरीत उतरला पण त्याचा वायरींना हात लागतातच सुरुंगाचा स्फोट झाला. ज्यामध्ये त्याच्या हाताच्या आणि शरीराच्या काही भागाच्या चिंधड्या झाल्या.

विहीर मालक पोलिसांच्या तब्यात

दरम्यान, घटनेचे गांभीर्य ओळखून विहीर ज्ञानेश्वर घागरे याने जखमी मजूर आणि मुलाला वैद्यकीय उपचारांसाठी दवाखान्यात नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, मजूराचा वाटेतच मृत्यू झाला. त्यानंतर विहीर मालकाने मजूराच्या पत्नीस तिचा पती अपघातात मृत्यू पावल्याचे कळविले. पत्नीस संशय आल्याने तिने तातडीने आपल्या भावाच्या मदतीने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटास्थळी येऊन पाहणी केली असता, हा अपपघात नव्हे तर निष्काळजीपणाने झालेली घटना असल्याचा प्राथमिक अंदाज बांधला. तसेच, सुरुंगाचा स्फोट होऊन मजुराचा मृत्यू झाल्याची घटना लपविण्यासाठी चक्क अपघाताचा कांगावा करणाऱ्या विहीर मालक शेतकरी आणि ब्लास्टींग मशीनच्या मालकाला ताब्यात घेतले आहे. महत्त्वाचे असे की, दगड फोडण्यासाठी वापरले जाणारे ब्लास्टींग मशिन हे सुद्धा विहीर मालकाच्याच मालकीचे आहे. (हेही वाचा, Washim: 7-8 फूट खोल नाल्यात पडून 3 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, वाशिम येथील घटना)

फॉरेन्सीक विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल

अंगलट आलेले प्रकरण निपटण्यासाठी सुरुवातीला ज्ञानेश्वर घागरे याने बनाव रचण्याचा प्रयत्न केला. परंतू, मजूर टेकाम याची पत्नी वनिता यांनी भाऊ दिवाकरवाढवे (रा. बोरखेडी) यांच्या मदतीने पोलिसांना माहिती दिली. प्राप्त माहितीवरुन, तळेगाव पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करत शेतकऱ्यास ताब्यात घेतले आहे. दरम्यान, रक्ताचे नमुने आणि ब्लास्टींगसाठी वापरण्यात आलेला सुरुंग आणि इतर माहितीसाठी फॉरेन्सिक विभागाचे अधिकारी घटनास्थळी पाहणी करुन गेले आहेत.

दरम्यान, पोटाची घळगी भरण्यासाठी अनेकदा मजूर म्हणून काम करणारे लोकांना धोकादायक कामे करावी लागतात. कधी कधी त्यांच्या असायहतेचा फायदा घेऊन मालक मंडळीही त्यांना जीवावर बेतणाऱ्या कामास जुंपत असतात. ज्यामुळे नजरचुकीने जरी अपघात घडला तरी, तो जीवावर बेतण्याच्या घटना घडतात, असे अनेकदा पुढे आले आहे.