प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

Murshidabad Explosion: मुर्शिदाबाद जिल्ह्यातील सागरपारा भागात बॉम्बस्फोट (Murshidabad Blast) झाल्याची घटना घडली आहे. यात तीन जण ठार झाले. मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्ती बॉम्ब बनवण्याचे काम करत असताना अचानक स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की आजूबाजूच्या परिसरात मोठा आवाज झाला. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून स्थानिक नागरिक घटनास्थळी पोहोचले. मृत तिघेही घरीच अवैध रित्या बॉम्ब बनवत होते.

स्फोटामुळे बॉम्ब बनवणाऱ्या तिघांचा मृत्यू झाला. त्याशिवाय, एका घराचे छत आणि भिंतीही स्फोटाच्या धडकेने कोसळल्या. घराचा ढिगारा रस्त्यावर पसरल्याने आजूबाजूच्या परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचले असून ढिगाऱ्याखाली दबले गेलेले मृतदेह बाहेर काढले आहेत. (Delhi School Bomb Threat: दिल्लीत 40 बॉम्बने उडवण्याची धमकी; ई-मेलद्वारे आलेल्या धमकीत 30 हजारांच्या खंडणीची मागणी)

पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती हाताळली

घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी आजूबाजूच्या परिसराला घेराव घालून परिस्थिती नियंत्रणात आणली. स्फोटाच्या कारणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. बॉम्ब बनवताना हा स्फोट झाल्याचे पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र, हा मुद्दाम कट होता का? हाही तपासाचा विषय समोर ठेवला आहे. पोलिसांनी परिसरात बंदोबस्त वाढवला आहे.

स्थानिक लोकांमध्ये भीती आणि चिंता

या घटनेनंतर स्थानिकांमध्ये असुरक्षिततेबाबत चिंता निर्माण झाली आहे. या प्रकरणाची पोलिसांकडून सखोल चौकशी करण्यात येत असून भविष्यात असा प्रकार पुन्हा घडू नये यासाठी शासनाने कठोर कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिक करत आहेत.