Team India (Photo Credit - X)

Ind vs Aus Live Streaming ICC Champions Trophy 2025: 2025च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या उपांत्य फेरीत भारतीय संघ ऑस्ट्रेलियाशी सामना करेल. या स्पर्धेत भारतीय संघाची कामगिरी उत्कृष्ट होती. संघाने पहिले दोन्ही सामने जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला. पहिल्या सामन्यात भारताने बांगलादेशला हरवले आणि दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानला 6 गडी राखून हरवले. यानंतर भारताचा सामना न्यूझीलंडशी झाला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाने हा सामना 44 धावांनी जिंकला.

आता पहिल्या उपांत्य फेरीत, भारताला 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकातील पराभवाचा बदला घेण्याची संधी असेल. दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला उपांत्य सामना कधी आणि कुठे खेळला जाईल हे जाणून घेऊयात. तसेच हा सामना टीव्ही आणि मोबाईलवर कसा पाहायचा? लाइव्ह स्ट्रीमिंगविषयी सर्व जाणून घेऊयात.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कधी खेळला जाईल?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा पहिला उपांत्य सामना मंगळवारी, 4 मार्च रोजी खेळला जाईल.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना कुठे खेळला जाईल?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा पहिला उपांत्य सामना दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना किती वाजता सुरू होईल?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा पहिला उपांत्य सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 2.30 वाजता सुरू होईल. नाणेफेक 2 वाजता होईल.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना टीव्हीवर कसा पाहायचा?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफी 2025चा पहिला उपांत्य सामना तुम्ही स्पोर्ट्स 18 नेटवर्कवर पाहू शकता.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना मोबाईलवर कसा पाहायचा?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफी 2025चा पहिला उपांत्य सामना तुम्ही तुमच्या मोबाईल फोनवर जिओ हॉटस्टार अॅपवर पाहू शकता.

भारतीय क्रिकेट संघ

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, ऋषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, हर्षित राणा.

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ

स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), शॉन अ‍ॅबॉट, अ‍ॅलेक्स कॅरी, बेन द्वारशुइस, नॅथन एलिस, जेक फ्रेझर मॅकगर्क, आरोन हार्डी, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, स्पेन्सर जॉन्सन, मार्नस लाबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, तन्वीर संघा, मॅथ्यू शॉर्ट, अ‍ॅडम झांपा.