Viral Video

Viral Video: भोपाल येथे मद्यधुंद अवस्थेत मुलगी मद्यधुंद अवस्थेत दुचाकीवर दोन मुलांच्या मध्ये बसून गोंधळ घालताना दिसत आहे. चालत्या दुचाकीवर मद्यधुंद अवस्थेत मुलीचे चाळे पाहून अनेक जण संतापले आहे.  कधी कधी लोक नशेत असताना सर्व मर्यादा ओलांडतात आणि मग त्यांना भानावर आणण्यासाठी पोलिसांना पुढे यावे लागते.  हा व्हिडिओ @ManojSh28986262 नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे, ज्याला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिलं असून लोकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. प्रचंड नशेत असलेली ही मुलगी रिल बनवण्यात इतकी मग्न असते की ती चालत्या बाईकवर उभी राहतांना दिसत आहे.

येथे पाहा, तरुणीचा व्हिडीओ: 

दुचाकीच्या मागच्या बाजूला बसलेला मुलगा मुलीला सांभाळायचा प्रयत्न करतो परंतु तरुणी काही ऐकत नाही. मुलगी इतकी मद्यधुंद होती की तिला जाणीवच नव्हती, ती रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना जोरजोरात शिव्या देत होती.