Chhaava Box Office Collection: छत्रपती संभाजी महाराजांवर आधारीत 'छावा' (Chhaava) चित्रपट बॉक्स ऑफिसवर भरपूर कमाई करत आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित तसेच विकी कौशल आणि रश्मिका मंदान्ना अभिनित चित्रपटाचा तिसरा आठवडा सुरू आहे. प्रेक्षकांचा त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत चित्रपटाचे एकूण कलेक्शन 458 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. चित्रपटाने तिसऱ्या आठवड्यात शुक्रवारी 13.30 कोटी, शनिवारी 22.50 कोटी आणि रविवारी 24.30 कोटींची कमाई केली. विकी कौशल आणि रश्मिका मंदान्ना यांचा हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला आहे.

'छावा' मध्ये विकी कौशल,रश्मिका मंदान्ना, अक्षय खन्ना आणि विनीत कुमार सिंग हे चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. सुरुवातीपासूनच बॉक्स ऑफिसवर मजबूत पकड राखत 'छावा'ने केवळ समीक्षकांचीच नाही तर प्रेक्षकांचीही मने जिंकली आहेत. चित्रपट ज्या वेगाने कमाई करत आहे ते पाहता, तो लवकरच ५०० कोटींच्या क्लबमध्ये सामील होऊ शकतो.

'छावा'ची बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)