Ayodhya Ram Mandir (PC - ANI)

Ayodhya Ram Mandir Terror Plot Foiled: गुजरात एटीएस आणि फरिदाबाद स्पेशल टास्क फोर्स (एसटीएफ) यांनी संयुक्त कारवाईत फरिदाबादमधून दहशतवादी संबंधांच्या संशयावरून एका व्यक्तीला अटक (Arrest) केली आहे. त्याच्याकडून दोन हँडग्रेनेडही जप्त करण्यात आले होते, जे सुरक्षा यंत्रणांनी तात्काळ निष्क्रिय केले. सूत्रांच्या माहितीनुसार, तो अयोध्येतील राम मंदिरावर हल्ला (Attack On Ayodhya Ram Mandir) करण्याचा कट रचत होता. संशयिताचे नाव अब्दुल रहमान (वय, 19) असे आहे. तो उत्तर प्रदेशातील फैजाबादचा रहिवासी आहे.

हरियाणा पोलिस आणि केंद्रीय एजन्सी अधिक माहितीसाठी अब्दुल रहमानची सखोल चौकशी करत आहेत. रेहमानचा मोबाईल आणि इतर जप्त केलेल्या साहित्याचीही चौकशी केली जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अब्दुल रेहमान अनेक दिवसांपासून बनावट ओळखपत्रासह फरीदाबादच्या पाली गावात राहत होता. जेव्हा अधिकारी त्याच्या जवळ आले तेव्हा त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला पकडण्यात आले. (हेही वाचा -Ayodhya Ram Mandir: भगवान रामलल्ला असलेल्या गर्भगृहात छतावरून पाण्याचा एक थेंबही टपकला नाही; ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांचे स्पष्टीकरण)

दरम्यान, गुजरात एटीएसने फरीदाबाद एसटीएफच्या मदतीने ही कारवाई केली. तपास यंत्रणा आता अब्दुल रहमानच्या संपर्कांचा शोध घेण्याचा आणि त्याचे हेतू जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. अब्दुलची चौकशी करण्यासाठी त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. अब्दुल रहमान हा आयएसआयच्या आयएसकेपी (इस्लामिक स्टेट खोरासान प्रांत) मॉड्यूलशी संबंधित आहे. (हेही वाचा - Man Arrested in Ayodhya Ram Mandir for wearing 'Glasses': अयोध्या राम मंदिर मध्ये तरूणाला अटक; चष्म्यातील खास कॅमेर्‍यातून टिपत होता फोटो)

सुरक्षा यंत्रणांमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अब्दुल रहमानला आयएसआयने अयोध्येतील राम मंदिरावर दहशतवादी हल्ला करण्यासाठी तयार केले होते. तो फैजाबादमध्ये मटणाचे दुकान चालवतो. या दहशतवाद्याने हातबॉम्बने हल्ला करून राम मंदिरात मोठा विनाश घडवण्याची योजना आखली होती. त्याने अनेक वेळा राम मंदिराची रेकी केली होती. तो फैजाबादहून ट्रेनने फरिदाबादला पोहोचला. एका हँडलरने त्याला हँडग्रेनेड दिले, जे तो ट्रेनने अयोध्येला परत घेऊन जाणार होता. सुदैवाने केंद्रीय एजन्सींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे त्याला अटक करण्यात आली.