Ayodhya Ram Mandir: अयोध्येतील राम मंदिरात पाणी गळण्याचा मुद्दा आता जोर धरू लागला आहे. मंदिराचे मुख्य पुजारी महंत सत्येंद्र दास यांनी गर्भगृहात सांडपाण्याचा निचरा नसणे आणि व्हीआयपी दर्शनाच्या ठिकाणी पाणी टपकत असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. मुख्य पुजाऱ्यांनी ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर नृपेंद्र मिश्रा म्हणाले होते की, मंदिराच्यावरचे छत उघडे असून बांधकामामुळे पाणी टपकत होते. आता रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, भगवान रामलल्ला ज्या गर्भगृहात आहेत, तिथे छतावरून पाण्याचा एक थेंबही टपकला नाही. तसेच कोठूनही गर्भगृहात पाणी आले नाही. अशाप्रकारे राय यांचे नवीन दावे मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांच्या दाव्यांचे खंडन करतात. (हेही वाचा: Ram Temple Construction: राम मंदिराचे बांधकाम मार्च 2025 पर्यंत पूर्ण होणार; राम मंदिर निर्माण समितीची माहिती)

पहा पोस्ट-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)