Ram Temple Construction: 'मंदिराच्या पहिल्या मजल्याचे बांधकाम पुढील महिन्याच्या अखेरीस पूर्ण होईल. त्यानंतर दुसऱ्या मजल्याचे काम सुरू होईल', असे नृपेंद्र मिश्रा यांनी म्हटले. एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार,'आम्ही या वर्षी डिसेंबरच्या अखेरीस दुसरा मजला आणि पुढील वर्षी मार्चपर्यंत संपूर्ण मंदिर परिसर पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे', असे ते पुढे म्हणाले.मंदिरात बसवल्या जाणाऱ्या मूर्ती राजस्थानमधील मकराना संगमरवरीवर कोरल्या जाणार आहेत. या कामासाठी ट्रस्टने चार शिल्पकारांची निवड करण्यासाठी निविदा काढली आहे.यावर्षी 22 जानेवारीला राम मंदिराचे उद्घाटन झाल्यानंतर आतापर्यंत 1.75 कोटीहून अधिक भाविकांनी राम मंदिराला भेट दिली आहे.

पोस्ट पहा-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)