Ayodhya Ram Mandir (File Photo)

अयोध्येमध्ये राम मंदिरात एका तरूण भक्ताला फोटो काढण्याच्या प्रयत्नामध्ये अडवण्यात आलं आहे. सध्या मंदिरात फोटो काढण्यास बंदी आहे. हा तरूण त्याच्या खास चष्मा मध्ये बसवलेल्या कॅमेर्‍याच्या मदतीने फोटो काढत असताना त्याला अडवण्यात आलं आहे. दरम्यान या मुलाचं नाव जयकुमार असून तो गुजरातच्या वडोदरा मधील आहे. जयकुमारला मंदिरात सुरक्षेत व्यत्यय आणल्याच्या कारणावरून ताब्यात घेण्यात आले आहे. रिपोर्ट्सनुसार त्याच्या चष्म्यामध्ये कन्सिल्ड कॅमेरा होता. याच्या माध्यमातून त्याला मंदिरात गाभार्‍यातील गोष्टी देखील टिपता येत होत्या.

अयोध्येचं राम मंदिर हे देशातील संवेदनशील आणि महत्त्वाच्या मंदिरांपैकी एक आहे. Sachin Gupta या X वरील युजरने या घटनेची माहिती सोशल मीडीयात दिली आहे. अयोध्या राम मंदिरचं काम जून 2025 पर्यंत पूर्ण होणार - नृपेंद्र शर्मा यांची माहिती .

कायद्याची अंमलबजावणी आणि गुप्तचर अधिकाऱ्यांनी परिस्थितीची चौकशी सुरू केली आहे. जयकुमारचा हेतू आणि कॅमेराचे कारण जाणून घेण्यासाठी त्याची चौकशी केली जात आहे. ही एकच घटना होती की मोठ्या प्लॅनचा भाग होता याचाही अधिकारी तपास करत आहेत. अशा पवित्र ठिकाणी छायाचित्रे घेण्याच्या गुप्त कृतीमुळे महत्त्वपूर्ण सुरक्षा धोके निर्माण होऊ शकतात आणि चौकशी अद्याप सुरू आहे. या घटनेमुळे धार्मिक स्थळांवर, विशेषत: अयोध्येतील राम मंदिरासारख्या राष्ट्रीय महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा उपाय वाढवण्याची मागणी केली गेली आहे.