
Shreya Ghoshal X Account Hack: प्रसिद्ध गायिका श्रेया घोषालने (Shreya Ghoshal) शनिवारी माहिती दिली की तिचे एक्स (ट्विटर) अकाउंट 13 फेब्रुवारीपासून हॅक झाले (Shreya Ghoshal X Account Hack) आहे आणि ती ते परत मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. परंतु, अद्यापपर्यंत तिला यश मिळालेले नाही. तिने ही माहिती तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केली.
श्रेया घोषाल पोस्ट
श्रेयाने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, "नमस्कार, चाहते आणि मित्रांनो. माझे ट्विटर / एक्स अकाउंट 13 फेब्रुवारीपासून हॅक झाले आहे. मी ते रिकव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे आणि एक्स टीमशी देखील संपर्क साधला आहे, परंतु आतापर्यंत फक्त ऑटो-जनरेटेड रिप्लाय मिळाले आहेत."
View this post on Instagram
खाते हटवूही शकत नाही
श्रेया घोषालला तिचे एक्स अकाउंट डिलीटही करता येत नाही. कारण, तिला अॅक्सेस मिळत नाही. तिने पोस्ट वर लिहिले की, "कृपया कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका किंवा त्या अकाउंटवरून पाठवलेल्या कोणत्याही मेसेजवर विश्वास ठेवू नका. ते सर्व स्पॅम आणि फिशिंग लिंक्स असू शकतात. जर माझे अकाउंट रिकव्हर झाले आणि सुरक्षित झाले तर मी स्वतः ते सांगेन."