IND vs PAK Asia Cup 2023 Live Update: आशिया कपच्या सुपर-4 फेरीत भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात सामना सुरू आहे. मात्र, पावसामुळे रविवारी भारत-पाकिस्तान सामना होऊ शकला नाही. त्यानंतर हा सामना राखीव दिवशी गेला. भारत आणि पाकिस्तान सामन्यासाठी 11 सप्टेंबर हा दिवस राखीव दिवस म्हणून ठेवण्यात आला होता. आज दोन्ही संघांमध्ये 50 षटकांचा पूर्ण सामना खेळवला जात आहे. दरम्यान, पाकिस्तानी छावणीतून एक वाईट बातमी समोर आली आहे. पाकिस्तानचा स्टार वेगवान गोलंदाज हरिस रौफ जखमी झाला आहे. खबरदारी म्हणून हरिस रौफ भारताविरुद्धच्या आशिया कप सुपर 4 सामन्यात यापुढे गोलंदाजी करणार नाही. तो संघाच्या वैद्यकीय समितीच्या देखरेखीखाली आहे.
JUST IN: Haris Rauf won't take the field on the reserve day after picking up a suspected side strain https://t.co/QMgeZdZNVQ #PAKvIND #AsiaCup2023 pic.twitter.com/VLeF2BCgkX
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) September 11, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)