Australian Men's Cricket Team vs India National Cricket Team: मेलबर्न येथे खेळल्या जात असलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 च्या चौथ्या कसोटीत नितीश कुमार रेड्डी (Nitish Kumar Reddy) यांनी शानदार शतक झळकावले. ऑस्ट्रेलियाचा भक्कम आणि अनुभवी गोलंदाज नितीशपुढे गुडघे टेकताना दिसले. शतक पूर्ण केल्यानंतर नितीशचे वडील मुत्याला रेड्डी यांची प्रतिक्रिया झटपट व्हायरल झाली. मेलबर्नमध्ये आपल्या मुलाने शतक झळकावल्याचे पाहून वडिलांना स्वतःवर नियंत्रण ठेवता आले नाही. आधी वडिलांनी आपल्या मुलाचे शतक साजरे केले आणि नंतर त्यांचे डोळे ओले झाले. नितीन कुमार रेड्डीने 171 चेंडूत 10 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने आपले शतक पूर्ण केले. नितीश आठव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी मैदानात उतरला होता. त्याने संघाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढले. त्याच्या शतकी खेळीने टीम इंडियाला मजबूत स्थान मिळवून दिले. नितीशसोबत वॉशिंग्टन सुंदरने अर्धशतक झळकावून महत्त्वाची भूमिका बजावली. रेड्डी आणि सुंदर यांनी आठव्या विकेटसाठी 127 (285 चेंडू) धावांची भागीदारी केली, ज्यामुळे टीम इंडियाला पहिल्या डावात मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करता आली.

शतकी खेळी पाहून नितेश रेड्डीच्या वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)