Australian Men's Cricket Team vs India National Cricket Team: ऑस्ट्रेलियन पुरुष क्रिकेट संघ विरुद्ध भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ (IND s AUS) यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 (Border-Gavaskar Trophy 2024-25) मालिकेतील चौथा बॉक्सिंग डे कसोटी सामना 26 डिसेंबरपासून मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळला जात आहे. 3 सामन्यांनंतर मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. त्याआधी, ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 474 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताचा पहिला डाव 369 धावांवर संपला. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने 105 धावांची आघाडी घेतली. पाचव्या दिवसाचा खेळ सुरू होताच ऑस्ट्रेलियन संघाचा दुसरा डाव 234 धावांवर आटोपला, तर टीम इंडियाला विजयासाठी 340 धावांचे लक्ष्य मिळाले. दरम्यान, लक्ष्याचा पाठलाग करताना टी-ब्रेकपर्यंत भारताने 3 विकेट गमावून 112 धावा केल्या आहे.
India take the blows and keep the fight 👊
ONE SESSION TO GO! 🚨
🔗 https://t.co/ycgxNhumqw | #AUSvIND pic.twitter.com/QzaEQU4LXj
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) December 30, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)