आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी फ्रेंचायझी असलेल्या मुंबई इंडियन्सच्या रिटेंशनकडे सर्वांचे लक्ष लागले होते. स्टार खेळाडूंनी सजलेल्या या टीमने 4 खेळाडूंना आपल्यासोबत कायम ठेवले आहे. मुंबई इंडियन्सने कर्णधार रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव आणि किरोन पोलार्ड या 4 खेळाडूंना आपल्यासोबत ठेवले आहे. तर इशान किशन, क्विंटन डी कॉक, हार्दिक पांड्या, ट्रेंट बोल्ट या सर्व खेळाडूंनी लिलावाचा रस्ता दाखवला आहे. आता अर्थातच पुढच्या मोसमात हा संघ खूपच वेगळा दिसणार आहे.मुंबईने 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 मध्ये आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)