Hardik Pandya-Natasa Stankovic's Separation Rumours: भारतीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी सर्बियन अभिनेत्री नताशा स्टॅनकोविक यांच्या विभक्त झाल्याची बातमी सोशल मीडियावर वेगाने पसरत आहे. मात्र, अद्याप याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. उल्लेखनीय आहे की, मे 2020 मध्ये हार्दिक आणि नताशाचे लग्न झाले होते. त्यांच्या लग्नानंतर अवघ्या काही महिन्यांतच त्यांचा मुलगा अगस्त्यचा जन्म जुलै 2020 मध्ये झाला. 2023 मध्ये या जोडप्याने हिंदू आणि ख्रिश्चन या दोन्ही धर्मांच्या रितीरिवाजांनुसार पुन्हा विवाह केला. पण, आता हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याचे दिसत आहे. काही चाहत्यांचे म्हणणे आहे की, या जोडप्याने सोशल मीडियावर एकमेकांबद्दल पोस्ट करणे बंद केले आहे. इतकेच नाही तर नताशाने तिच्या इंस्टाग्राम बायोमधून पांड्या आडनाव काढून टाकले आहे. त्याचवेळी, हार्दिकने नताशाला 4 मार्च रोजी वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या नाहीत. हे देखील पाहा: Hardik Pandya-Natasa Stankovic's Separation Rumours: हार्दिक-नताशा में क्या आ चुकी है दरार, सोशल मीडिया पर चल रही है तलाक की खबर!

पाहा पोस्ट:

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)