
हेपिटायटीस (Hepatitis) या आजाराविषयी जनजागृती करण्यासाठी दरवर्षी 28 जुलै हा दिवस वर्ल्ड हेपिटायाटीस डे म्हणून साजरा केला जाततो. एका संशोधनाच्या माहितीनुसार, जगभरात 29 कोटी लोक हेपिटायटीसच्या आजाराने त्रस्त आहेत. त्यापैकी अनेकांना या आजाराविषयी माहिती देखील नाही. परिणामी उपचाराअभावी अनेकजणांचा जीव हेपिटाईटीसमुळे जातो. साधारणपणे जगात 14 लाख लोकांचा बळी हेपिटायटीसमुळे जातो. दरम्यान हेपिटायटीसचा व्हायरस शोधून काढण्यासाठी प्रोफेसर बारूक ब्लमबर्ग यांचे विशेष योगदान आहे. 28 जुलै हा त्यांचा जन्मदिवस याच कार्याचा गौरव म्हणून आणि हेपिटायटीस आजाराच्या सजगतेसाठी जगभर 28 जुलै देखील वर्ल्ड हेपिटायटीस डे म्हणून पाळला जातो. 2010 साली WHO म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेने या आजाराबद्दल जनजागृती निर्माण व्हावी म्हणून त्याचा समावेश सार्वजनिक स्वास्थ्य कार्यक्रमामध्ये केला.
वर्ल्ड हेपेटाइटिस डे 2020 थीम
जगभरात यंदाचा हेपिटायटीस डे हा Hepatitis-free future या थीमवर आयोजित केला आहे. यामध्ये माता आणि नवजात बालकं यांच्यामधील हेपिटायटीस बी चा धोका टाळण्यासाठी विशेष खबरदारी घेण्याबाबत जनजागृती केली जाणार आहे.
हेपिटायटीस आजार आणि प्रकार
हेपिटायटीस हा आजार पाच वेगवेगळ्या प्रकारांमध्ये आहे. हेपिटायटीस ए, बी, सी, डी आणि ई अशा 5 स्वरूपांमध्ये त्यांच निदान केले जाते. प्रामुख्याने या आजारामध्ये लिव्हर म्हणजेच यकृताचं कार्य बिघडत आणि त्यामधून शरीरात गुंतागुंत निर्माण होते. जगभरात हेपिटायटीस बी आणि सी यांच्यामुळे रूग्ण दगावण्याचं प्रमाण अधिक आहे. 290 मिलियन लोकांचा या आजारामुळे जीव जाण्यामागील एक कारण म्हणजे या अजाराबद्दल सजगता नसणं ही एक आहे.
हेपिटायटीस चा धोका टाळण्यासाठी काय कराल?
- हेपिटायटीसचा धोका टाळण्यासाठी नवजात बालकांना वेळीच हेपिटायटीस बी चा डोस आणि पुढील इंजेक्शन द्या.
- रक्त घेताना ते लायसंस असलेल्या रक्तपेढीमधून आणि सुरक्षित घ्या.
- इतरांनी वापरलेली सिरीन, इंजेक्शन निडल्स, रेझर, ब्लेड वापरणं टाळा.
- सेक्स करताना सुरक्षेची काळजी घ्या.
- जेवणापूर्वी आणि शौचालयांचा वापर केल्यानंतर हात स्वच्छ साबणाने धुण्याची सवय ठेवा.
- सुरक्षित पाणी आणि अन्न सेवन करा.
दरम्यान वेळीच हेपिटायटिसचं निदान होणंदेखील गरजेचे आहे. त्यासाठी निदान करण्याकरिता व्हायरल सिरॉलोजी आणि हेपिटायटिस पॅनल काम करतात. व्हायरल सिरॉलॉजी पॅनल रक्त चाचणी करून तुम्हांला हेपिटायटिसची लागण झाली आहे का? याचं निदान करू शकते.