Asia Cup 2025 (Photo Credit - X)

Asia Cup 2025 Poins Table: १५ सप्टेंबर रोजी एसीसी आशिया कप २०२५ मध्ये दोन महत्त्वाचे सामने खेळले गेले. पहिल्या सामन्यात यूएईने ओमानचा ४२ धावांनी पराभव केला, तर दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेने हाँगकाँगला ४ विकेट्सने हरवले. या दोन्ही सामन्यांनंतर स्पर्धेत सहभागी असलेल्या ३ संघांचे भवितव्य निश्चित झाले आहे. या विजयांमुळे गुणतालिकेत मोठे बदल झाले असून काही संघांना स्पर्धेतून बाहेर पडावे लागले आहे. (हे देखील वाचा: BAN vs AFG, Asia Cup 225 Live Streaming: बांग्लादेशसाठी ‘करो या मरो’ची लढाई; आज अफगाणिस्तानशी होणार महत्त्वपूर्ण सामना)

श्रीलंकेने गुणतालिकेत केले अव्वल स्थान निश्चित

हाँगकाँग आणि श्रीलंका यांच्यातील सामन्यात हाँगकाँगने प्रथम फलंदाजी करताना १४९ धावा केल्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेने ६ विकेट गमावून हे लक्ष्य सहज गाठले. या विजयासह श्रीलंका संघ ग्रुप बी मध्ये अव्वल स्थानावर पोहोचला आहे, तर त्यांचा नेट रन रेट +१.५४६ इतका आहे. अफगाणिस्तान २ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर असून, त्यांचा नेट रन रेट +४.७०० आहे. बांग्लादेश २ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे, सलग पराभवांमुळे हाँगकाँगचा संघ स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

टीम इंडियाची सुपर-४ मध्ये एन्ट्री

यूएई आणि ओमान यांच्यातील सामन्यात प्रथम फलंदाजी करताना यूएईने १७२ धावा केल्या. ओमानचा संघ केवळ १३० धावांवरच बाद झाला. या विजयानंतर यूएईचा संघ २ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. तर ग्रुप ए मध्ये, टीम इंडिया २ सामन्यांमध्ये ४ गुणांसह अव्वल स्थानी असून त्यांनी सुपर-४ मध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. भारताचा नेट रन रेट +४.७९३ इतका जबरदस्त आहे. ओमानचा संघ शून्य गुणांमुळे स्पर्धेबाहेर झाला आहे. ग्रुपमध्ये पाकिस्तानचा संघ २ सामन्यांमध्ये २ गुणांसह दुसऱ्या स्थानावर कायम आहे.