Kids Allergies | Representative Image (image source: Pexels)

युनिव्हर्सिटी ऑफ रोचेस्टर मेडिकल सेंटर (URMC) येथील वैज्ञानिकांनी केलेल्या एका नव्या अभ्यासातून, बालपणात प्रतिकारशक्ती कशी विकसित होते आणि शहरी मुलांमध्ये अ‍ॅलर्जी (Urban Vs Rural Allergies) का जास्त प्रमाणात आढळते, यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. या अभ्यासात असे आढळले की, प्रतिकारशक्तीतील एक विशिष्ट प्रकारच्या पेशी (T cells) शहरी मुलांमध्ये अ‍ॅलर्जी (Allergy In Children) वाढण्याचं मुख्य कारण ठरू शकतात. URMC च्या पीडियाट्रिक्स विभागातील एमडी/पीएचडी विद्यार्थिनी कॅथरीन पिझारेल्लो आणि प्रमुख संशोधक डॉ. किर्सी जार्विनेन-सेप्पो यांच्या नेतृत्वाखाली या अभ्यासात ‘थेल्पर 2’ (Th2) नावाच्या अनोख्या प्रकारच्या टी पेशींचा शोध लागला. या पेशींना विशिष्ट आण्विक गुणधर्म असून, त्या शरीरात काही अन्नपदार्थांना घातक समजून त्यांच्यावर हल्ला करत असल्याचं आढळून आलं.

शहरी भागातील मुलांमध्ये या पेशींचं प्रमाण जास्त

डॉ. जार्विनेन-सेप्पो यांनी स्पष्ट अभ्यासात म्हटले आहे की, या पेशी इतर कुठल्याही याआधी पाहिलेल्या अ‍ॅलर्जी संबंधित पेशींपेक्षा जास्त तीव्र आहेत, त्या पुढे म्हणाल्या की, शहरी भागातील मुलांमध्ये या पेशींचं प्रमाण जास्त आढळलं, आणि या मुलांमध्ये पुढे अ‍ॅलर्जी झाल्याचं दिसून आलं. त्यामुळे या पेशी अ‍ॅलर्जीचं पूर्वसूचक लक्षण किंवा कारण असू शकतात. या अभ्यासात न्यूयॉर्कच्या फिंगर लेक्स परिसरातील ‘ओल्ड ऑर्डर मेनोनाइट’ (OOM) समुदायातील ग्रामीण भागातील बाळांच्या रक्तनमुना आणि शहरी बाळांच्या नमुन्यांची तुलना करण्यात आली. ग्रामीण मुलांमध्ये अ‍ॅलर्जीचं प्रमाण खूपच कमी असल्याचं आधीपासूनच ज्ञात होतं. (हेही वाचा, महिलांच्या शाम्पू, लोशन, बॉडी सोप मध्ये मोठ्या प्रमाणात कॅन्सर ला कारणीभूत केमिकल्स आढळली- अभ्यासातून समोर आला दावा)

नमुने तपासल्यावर असं आढळलं की, शहरी बाळांमध्ये आक्रमक Th2 पेशींचं प्रमाण अधिक होतं, तर OOM समुदायातील मुलांमध्ये प्रतिकारशक्ती संतुलित ठेवणाऱ्या ‘रेग्युलेटरी टी सेल्स’चं प्रमाण जास्त होतं. हे पेशी अ‍ॅलर्जीक प्रतिक्रियांचं प्रमाण कमी करतात. यामागचं नेमकं कारण अजून स्पष्ट झालेलं नसलं तरी, डॉ. जार्विनेन-सेप्पो यांच्या मते, दोन्ही समुदायांमधील आतड्यांतील मायक्रोबायोमच्या विकासातील फरक आणि ग्रामीण मुलांमध्ये आरोग्यदायी बॅक्टेरियांचं अधिक प्रमाण हे संभाव्य कारण ठरू शकतं.