
Man Gets Fungal Infection After Drinking Coconut Water: उन्हाळ्यात नारळपाणी (Coconut Water) हे आरोग्यदायी आणि थंडगार पेय मानले जाते. लोकांना ते विशेषतः समुद्रकिनारे प्यायला खूप आवडते. पण जर या नारळ पाण्यामुळे तुमच्या जीवाला धोका निर्माण झाला तर? असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे, जिथे नारळ पाणी प्यायल्यानंतर एका व्यक्तीचा मेंदूला इजा झाल्याने मृत्यू झाला. एका 69 वर्षीय डॅनिश व्यक्तीने शिळे आणि खराब झालेले नारळ पाणी प्यायले, त्यानंतर काही तासांतच त्याची तब्येत बिघडू लागली. केवळ 26 तासांतच त्याचा मृत्यू झाला.
रिपोर्ट्सनुसार, या माणसाने एक महिना शिळे नारळ पाणी प्यायले होते, जे रेफ्रिजरेटरमध्ये साठवले नव्हते. त्याला नारळाची चव विचित्र वाटली म्हणून त्याने ते जास्त प्यायले नाही, परंतु थोड्या प्रमाणात प्यायल्याने त्याच्या शरीरात घातक बुरशीजन्य संसर्ग (Fungal Infection) झाला. यानंतर, त्याला घाम येऊ लागला, उलट्या होऊ लागल्या, त्याचा तोल गेला आणि तो कोसळला. त्याला रुग्णालयात दाखल केल्यानंतर, डॉक्टरांना आढळले की, त्याच्या मेंदूला गंभीर सूज आली आहे. 26 तासांनंतर त्याला मेंदू मृत घोषित करण्यात आले. (हेही वाचा - Summer Fatigue Symptoms & Tips to Manage: उन्हाळ्यातील थकवा ठरू शकतो धोकादायक; जाणून घ्या लक्षणे व कशी कराल मात)
संसर्ग कसा झाला?
अभ्यासानुसार, नारळ कमी तापमानात (4-5°C) साठवण्याचा सल्ला दिला जातो, परंतु हे नारळ खोलीच्या तपमानावर सुमारे एक महिना ठेवले गेले, ज्यामुळे त्यात बुरशी आणि बॅक्टेरियाची वाढ झाली. अहवालात म्हटले आहे की जेव्हा रुग्णाने नारळ उघडला तेव्हा त्याचे आतून चिकट आणि कुजलेले होते, ज्यामुळे ते खराब झाले होते आणि त्यात धोकादायक बॅक्टेरिया असल्याचे सिद्ध झाले. (हेही वाचा: Advisory On Heatwave: नवी मुंबईकरांनो लक्ष द्या! राज्यात तापमानात वाढ, उष्णतेच्या लाटेबाबत काळजी घेण्यासाठी महानगरपालिकेने जारी केल्या सूचना)
नारळ पाणी पिताना 'ही' काळजी घ्या -
नेहमी ताजे नारळ निवडा. फुटलेले किंवा उघडे नारळ टाळा कारण त्यात बॅक्टेरिया असू शकतात. जर नारळ आधीच सोललेला किंवा उघडलेला असेल तर तो ताबडतोब रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा. जर नारळाची चव बदललेली वाटत असेल किंवा त्याचा पोत विचित्र असेल तर ते पिऊ नका.