Bidi is More Dangerous than Cigarette: दरवर्षी 13 मार्च रोजी ‘नो स्मोकिंग डे’ (No Smoking Day) साजरा केला जातो. या दिवशी धुम्रपानाच्या हानींबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्याचे काम केले जाते. नुकतेच किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटी (KGMU), लखनऊ येथे ‘नो स्मोकिंग डे’च्या दोन दिवस आधी 18वा पल्मोनरी पीजी अपडेट प्रोग्रॅमचर आयोजन केले होते. यावेळी तज्ज्ञांनी सांगितले की, बिडी (Bidi) ही सिगारेटपेक्षा (Cigarette) आठपट जास्त हानिकारक असू शकते. बिडीबद्दल लोकांचा असा समज आहे की, त्यात तंबाखूचे प्रमाण कमी असते आणि ती सिगारेटपेक्षा कमी हानिकारक असते, मात्र हा समाज चुकीचा आहे.
तज्ज्ञांच्या मते, बिडीच्या पानांचे विपरित परिणाम आणि खोल श्वासोच्छवासामुळे बिडी ही सिगारेटपेक्षा जास्त धोकादायक असल्याचे सिद्ध होते. वल्लभभाई पटेल चेस्ट इन्स्टिट्यूट (VPCI), दिल्लीचे माजी संचालक प्रोफेसर राजेंद्र प्रसाद यांनी बीडी आणि सिगारेटची तुलना करणाऱ्या अभ्यासाच्या मदतीने माहिती दिली की, दोन्हीही हानिकारक मानले जात होते, परंतु तंबाखूभोवती पाने गुंडाळून बनवलेली बीडी जाळल्याने जास्त धूर निर्माण होतो.
प्राध्यापक राजेंद्र प्रसाद म्हणाले की, धूम्रपान करणारे बीडी पेटवण्यासाठी खोल श्वास घेतात, त्यामुळे फुफ्फुसांना अधिक गंभीर नुकसान होते. सिगारेटच्या तुलनेत बिडीमध्ये तंबाखूचे प्रमाण चौपट कमी असले तरी, त्याच प्रमाणात तंबाखू बिडीमध्ये वापरल्यास ते आठपट जास्त धोकादायक ठरू शकते. दरम्यान, सिगारेट, हुक्का, सिगार, बिडी, खैनी, गुटखा किंवा जर्दा कोणत्याही स्वरूपात तंबाखूचे सेवन आरोग्यासाठी चांगले नाही. हे भारतातील मृत्यू आणि रोगाच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे आणि हे घटक दरवर्षी अंदाजे 1.35 दशलक्ष मृत्यूंना कारणीभूत ठरतात. (हेही वाचा: Fatal 'Parrot Fever' Outbreak: प्राणघातक 'पॅरोट फिव्हर'मुळे युरोपात 5 जणांचा मृत्यू; WHO ने व्यक्त केली चिंता, जाणून घ्या काय आहे Psittacosis आजार, त्याची लक्षणे व इतर माहिती)
जागतिक स्तरावर, अंदाजे 1.3 दशलक्ष धूम्रपान न करणाऱ्यांसह दरवर्षी 8 दशलक्षाहून अधिक लोकांचा मृत्यू होतो. हे असे लोक आहेत जे तंबाखूच्या धुराच्या संपर्कात आहेत. तंबाखू हे तोंड आणि घशासह 9 प्रकारचे कर्करोग, क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी रोग, हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकचा धोका, उच्च रक्तदाब, एरिथमिया आणि एथेरोस्क्लेरोसिस या घातक आजारांचे मूळ ठरू शकते.