Dhanteras 2025 Greetings: दिव्यांचा सण, दिवाळीची (Diwali) सुरुवात करणारा महत्त्वपूर्ण सण म्हणजे धनत्रयोदशी होय. याला धनतेरस किंवा धनत्रयोदसी असेही म्हणतात. यंदा 17 ऑक्टोबर २०२५ रोजी म्हणजे आज धनत्रयोदशीचा सण साजरा केला जात आहे. या दिवशी भक्तजन धन-समृद्धीची देवी लक्ष्मी, धनाची देवता कुबेर आणि आरोग्य देवता धन्वंतरी यांची विशेष पूजा करतात. हिंदू पंचांगानुसार, कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला धनत्रयोदशी साजरी केली जाते. (हे देखील वाचा: Vasubaras 2025 Messages In Marathi: 'वसुबारस'निमित्त खास मराठी Wishes, HD Images, Wallpapers, Greetings शेअर करून द्या दिवाळीच्या पहिल्या दिवसाच्या शुभेच्छा)

धनत्रयोदशीचे महत्त्व:

१. भगवान धन्वंतरी जयंती:

  • द्रिक पंचांगनुसार, धनत्रयोदशीचा दिवस धन्वंतरी त्रयोदसी किंवा धन्वंतरी जयंती म्हणूनही साजरा केला जातो.
  • धन्वंतरी हे आयुर्वेदाचे देवता आहेत. असे मानले जाते की, त्यांनी मानवजातीच्या कल्याणासाठी आयुर्वेदाचे ज्ञान दिले, जेणेकरून लोकांना रोगांपासून मुक्ती मिळू शकेल.

२. समुद्रमंथन आणि देवी लक्ष्मी:

  • पौराणिक कथेनुसार, धनत्रयोदशीच्या दिवशी समुद्रमंथनाच्या वेळी देवी लक्ष्मी आणि धनाची देवता कुबेर प्रकट झाले होते. म्हणूनच या दिवशी त्यांची पूजा केल्याने कुटुंबात संपत्ती आणि समृद्धी येते.

३. यमदीप दान (अकाली मृत्यूपासून संरक्षण):

  • धनत्रयोदशीच्या दिवशी लोक रात्री घराबाहेर यमराजासाठी दिवे लावतात, ज्याला यमदीप म्हणतात.
  • पौराणिक कथेनुसार, त्रयोदशी तिथीला यमदीप प्रज्वलित केल्याने मृत्यूचे देवता यमराज प्रसन्न होतात आणि घरात अकाली मृत्यू येत नाही.

खाली WhatsApp स्टिकर्स, GIF आणि HD वॉलपेपर शुभेच्छा दिल्या आहेत, ज्या तुम्ही धनत्रयोदशीच्या शुभेच्छा देण्यासाठी पाठवू शकता.

धनत्रयोदशीच्या शुभदिनी,

आपुल्या सदनी व्हावी बरसात धनाची

करोनी औचित्य दिपावलीचे,

बंधने जुळावी मनामनांची...

धनतेरसच्या हार्दिक शुभेच्छा!

धनत्रयोदशीच्या निमित्ताने

आपणास व आपल्या कुटुंबास

धन आणि आरोग्य लाभो या सदिच्छा

शुभ दीपावली!

धनतेरसच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा!

धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी,

विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..

या दिपावलीत अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत,

धनत्रयोदशी आणि दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

धनत्रयोदशीला काय खरेदी करणे शुभ मानले जाते?

धनत्रयोदशीला खालील वस्तू खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते:

  • सोन्या-चांदीचे दागिने किंवा नाणी
  • नवीन भांडी (विशेषतः तांब्याचे किंवा पितळेचे भांडे)
  • इलेक्ट्रॉनिक वस्तू (उदा. फ्रीज, टीव्ही)
  • वाहने