लहान व्यापाऱ्यांना GST संदर्भात मोठा दिलासा, फक्त SMS च्या माध्यमातून भरता येणार Tax Return
प्रतिकात्मक फोटो Photo Credit: PTI

केंद्र सरकारकडून देशातील लाखो व्यापाऱ्यांना एक मोठा दिलासा दिला आहे. तर आर्थिक वर्ष 2018-19 साठी वर्षभराचे GST Return-9 आणि GSTR-9C दाखल करण्याचा कालावधी वाढवला आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्स अॅन्ड कस्टम्स (CBIC) यांनी असे म्हटले की, जीएसटी रिटर्न भरण्याची 31 ऑक्टोंबर 2020 ही तारिख वाढवत ती आता 31 डिसेंबर 2020 अशी केली आहे. खरंतर कोरोनाच्या संकट काळात देशात अद्याप काही गोष्टी सुरळीत सुरु झालेल्या नाही आहेत.(EMI cashback: आनंदाची बातमी! लॉकडाऊन काळात कर्जाचा हप्ता भरला आहे? तर मग सज्ज रहा कॅशबॅक मिळविण्यासाठी; सरकारचे निर्देश)

तर GST नेटवर्क कंपोजीशन टॅक्सपेयर्स (Composition taxpayers) साठी ज्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे देणे किंवा कर्ज NIL आहे त्यांनाच फक्त SMS च्या माध्यमातून तिमाही रिटर्न भरण्याची सुविधा सुरु केली आहे. कंपोजीशन स्किम अंतर्गत एकूण 17.11 लाख टॅक्सपेयर्स यांचे रजिस्ट्रेशन आहे. यामध्ये 20 टक्के म्हणजेच 3.5 लाख टॅक्सपेयर्स NIL रिटर्न असणारे आहेत. मात्र ज्यांच्या बिझनेस संदर्भातील एखादे कर्ज असल्यास त्यांना या सुविधेचा फायदा घेता येणार नाही आहे. तर येथे पहा SMS च्या माध्यमातून तुम्ही कशा पद्धतीने GST Return भरु शकता.

-व्यापाऱ्यांनी जीएसटी रिटर्न भरण्यासाठी मोबाईलमध्ये ‘NIL <space>C8<space>GSTIN<space>Return Period’ टाइप करुन 14409 या क्रमांकावर SMS पाठवावा लागणार आहे.

-एसएमएस पाठवल्यानंतर टॅक्सपेयरला 6 डिजिटचा वेरिफिकेशन कोड क्रमांक मोबाईलवर येईल.

-हा 6 डिजिट कोड पुन्हा 14409 या क्रमांकावर पाठवावा लागणार आहे. कारण त्यामुळे तुमचा NIL फॉर्म कंन्फर्म होऊ शकणार आहे.

-GST पोर्टल टॅक्सपेअर्स मोबाइल, ई-मेलवर Application Reference Number (ARN) पाठवला जाईल.

-टॅक्सपेयर GST पोर्टल फॉर्म CMP-08 चे स्टेटर पाहू शकतो. जेथे Filed असे दिसेल.

-जर टॅक्सपेयरने सांगितल्या प्रमाणे SMS पाठवला नाही तर त्याचे रिटर्न फाइल दाखल केले जाणार नाही.

(हेही वाचा- ITR Filing Deadline: वैयक्तिक करदात्यांना दिलासा! आर्थिक वर्ष 2019-2020 साठी आयटीआर फायलिंग करण्यासाठी 31 डिसेंबर पर्यंत मूदतवाढ)

दरम्यान, ज्या टॅक्सपेयरचे अकाउंट ऑडिट शिल्लक आहे त्यांना Income Tax रिटर्न फाइल करण्यासाठीचा अवधी दोन महिन्यांनी वाढवला आहे. त्यामुळे त्यांना 31 जानेवारी 2021 पर्यंत रिटर्न फाइल करता येणार आहे. तर GST आणि Income Tax रिटर्न फाइल करण्यासंबंधित अधिक माहिती त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.