India Money | (Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

कोरोना व्हायरस (Coronavirus) लॉकडाऊन (Lockdown) काळात तुम्ही तुमच्या कर्जाचा हप्ता भरला आहे? असे असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी (Good news) आहे. होय, केंद्र सरकारने बँकांना नुकतेच आदेश दिले आहेत. या निर्देशानुसार आपणास कॅशबॅक देण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या निर्देशामध्ये म्हटले आहे की, लॉकडाऊन काळात जर ग्राहकाने मोराटोरियम फायदा घेतला नाही आणि जर आपल्या कर्जाचे हप्ते (EMI ) भरले असतील तर त्या ग्राहकांना कॅशबॅक मिळेल. भारतीय रिजर्व्ह बँक (RBI) च्या माध्यमातून कर्जाच्या ईएमआय (हप्ते) व घेण्यात आलेल्या व्याजावर सूट देण्याचे निर्देश केंद्र सरकारने जारी केले आहेत. या निर्देशानुसार कर्जदारांना फेस्टिव्ह सीजन काळात व्याजावर घेतलेल्या व्याजाची रक्कम परत मिळणार आहे.

कुणाला मिळणार फायदा?

सरकारने आपल्या निर्देशांमध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की ज्या कर्जदारांनी मोरोटोरियम फायदा घेतला नाही आणि त्यांनी हप्ते भरले आहेत. हे सर्व हप्ते वेळेवर भरले आहेत, अशा ग्राहकांना बँकांकडून कॅशबॅक मिळेल. या योजनेच्या अंतरग्त कर्जदारांना साध्या आणि कंम्पाउंड इंट्रेस्टमध्येही फरकाचा लाभ मिळेल. (हेही वाचा, Documents For Home Loan: गृह कर्ज घेताय? तर 'हे' कागदपत्रं ठेवा तयार; जाणून घ्या संपूर्ण लिस्ट)

कोरोना महामारीमुळे निर्देश

केंद्र सरकारने असे निर्देश का दिले असावेत असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्णाण झाला. मात्र, त्याचे उत्तर सरकारकडूनच देण्यात आले आहे. ते असे की, भारतीय रिझर्व्ह बँकेने कोोरना व्हायरस महामारीत झालेली ग्राहकांची गैरसोय विचारात घेऊन सहा महिन्यांसाठी मोराटोरियमची सोय उपलब्ध करुन दिली होती. या काळात अनेक लोक आर्थिक कारमामुळे आपल्या कर्जाचा हप्ता भरु शकले नाहीत. अशा कर्जदारांना फायदा मिळावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, काही कर्जदारांनी मोराटोरियम काळातही आपल्या कर्जाचे हाप्ते वेळेवर भरले आहेत, अशा ग्राहकांनाही कॅशबॅक मिळणार आहे.