ITR Filing Deadline: वैयक्तिक करदात्यांना दिलासा! आर्थिक वर्ष 2019-2020 साठी आयटीआर फायलिंग करण्यासाठी 31 डिसेंबर पर्यंत मूदतवाढ
Income Tax Return File | (Images for symbolic purposes only । Photo Credits: pixabay)

करदात्यांसाठी दिलासादायक बातमी समोर येत आहे. आर्थिक वर्ष 2019-2020 (Financial Year 2019-2020) साठी आयटी रिटर्न फाईल (ITR Filing) करण्याची तारीख 31 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. मात्र ही मुदतवाढ केवळ वैयक्तिक करदात्यांसाठी देण्यात आली आहे. मे महिन्यामध्ये सरकारने आयटी रिटर्न फायलिंगची तारीख 31 जुलै ते 30 नोव्हेंबर पर्यंत वाढवली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा यात मुदतवाढ देण्यात आली आहे. (जाणून घ्या,  इन्कम टॅक्स रिटर्न व्हेरिफाय करण्याची पद्धत)

दरम्यान, ज्या खात्यांचे ऑडिट करणे आवश्यक आहे त्यांच्यासाठी आयटीआर दाखल करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी आहे. ज्या व्यक्तींना आपले अकाऊंटचे ऑडिट करण्याची गरज आहे अशा करदात्यांसाठी इन्कम टॅक्स फायलिंगची अंतिम तारीख 31 जानेवारी 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे, यापूर्वी ही मूदत 31 ऑक्टोबर 2020 पर्यंत होती, अशी माहिती सेंटर बोर्ड ऑफ डिरेक्ट टॅक्सेसकडून देण्यात आली आहे.

ANI Tweet:

त्याचबरोबर सेंटर बोर्ड ऑफ डिरेक्ट टॅक्सेसकडून ऑडिट रिपोर्ट संपवण्याची मूदतही वाढवून देण्यात आली आहे. यात टॅक्स ऑडिट रिपोर्ट आणि इंटरनॅशनल/स्पेसिफाईड डोमॉस्टीक ट्रॅन्झक्शनचा समावेश आहे. ही तारीख 31 डिसेंबर पर्यंत वाढवण्यात आली आहे. तसंच आर्थिक वर्ष 2018-2019 चा  वार्षिक परतावा (FORM GSTR-9/GSTR-9A) आणि रिकॉन्सिलिएटिओ स्टेटमेंट (FORM GSTR-9C) करण्यासाठीही मूदतही 31 डिसेंबर 2020 पर्यंत वाढवण्यात आली आहे. यापूर्वी याची अंतिम तारीख 31 ऑक्टोबर 2020 होती.

दरम्यान, कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर करदात्यांना आयटीआर फायलिंग करण्यासाठी अर्थ मंत्रालयाकडून मुदत वाढवून देण्यात आली होती. त्यानंतर सातत्याने यात मुदतवाढ देऊन करदात्यांना दिलासा दिला जात आहे.