Online Job Apply | Photo Credits: Pixabay.com

RRB NTPC Exam 2025 Dates:  रेल्वे भरती मंडळाने 13 मे 2025 रोजी RRB NTPC परीक्षा 2025च्या तारखा जाहीर केल्या आहेत. ज्या उमेदवारांनी RRB नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज (पदवीधर) साठी नोंदणी केली आहे ते प्रादेशिक RRB च्या अधिकृत वेबसाइटवर CBT 1 परीक्षेच्या तारखांची नोटीस पाहू शकतात. RRB NTPC Computer Based Test 1 ही 5 जून ते 23 जून 2025  दरम्यान घेतली जाणार आहे. CBT 1 परीक्षेचा कालावधी 90 मिनिटांचा आहे आणि प्रत्येक प्रश्नाला 1 गुण आहे. एकूण 100 प्रश्न असतील त्यापैकी 40 प्रश्नGeneral Awareness, 30 प्रश्न Mathematics General Intelligence आणि Reasoning section मधून विचारले जातील. निगेटिव्ह मार्किंग असल्याने प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1/3 गुण वजा केले जातील.

RRB NTPC पदवीधर स्तरावरील 8113 पदे भरणार आहेत. त्यापैकी Chief Commercial cum Ticket Supervisor 1736, स्टेशन मास्टरसाठी 994, गुड्स ट्रेन मॅनेजरसाठी 3144, कनिष्ठ लेखा सहाय्यक कम टंकलेखकांसाठी 1507 आणि वरिष्ठ लिपिक कम टंकलेखक पदांसाठी 732 पदे भरली जातील.  इथे पहा अधिकृत नोटिफिकेशन.

उमेदवारांना परीक्षेच्या तारखेच्या 10 दिवस आधी त्यांचे परीक्षेचे शहर आणि तारीख पाहता येईल आणि ट्रॅव्हल अथॉरिटी (एससी/एसटी उमेदवारांसाठी) डाउनलोड करता येईल. या तपशीलांच्या लिंक्स संबंधित आरआरबीच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध करून दिल्या जातील. याव्यतिरिक्त, परीक्षेसाठी ई-कॉल लेटर नियोजित परीक्षेच्या तारखेच्या 4 दिवस आधी डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध असतील.