जम्मू कश्मीर येथे जिल्हा विकास परिषद निवडणुकांच्या मतमोजणी सुरू झाली असून विवध पक्षाला मिळालेल्या मतांची आकडेवारी समोर येत आहे.

आसाम येथे कोरोनाच्या रुग्णांचा आकडा 2,15,585  वर पोहचला  आहे.

भूतानमध्ये 23 डिसेंबरपासून पुढील सात दिवस देशव्यापी लॉकडाउन लागू करण्यात आले आहे. थिम्फू आणि पारो आणि ल्हमोइझिंग्खा येथे फ्लू क्लिनिकमध्ये काही रुग्ण आढळल्यानंतर, नॅशनल कोविड टास्कफोर्सला अधिक कठोर कारवाईची गरज भासली. पंतप्रधान कार्यालयाने याबाबत माहिती दिली आहे.

मार्च 2021 मध्ये SSLC आणि PUC परीक्षा होणार नसल्याचे कर्नाटकचे शिक्षणमंत्री एस सुरेश कुमार यांनी सांगितले. राज्यात 10 वी आणि 12 वीचे वर्ग 1 जानेवारी 2021 जानेवारीपासून सुरू होणार आहेत.

23 डिसेंबरपासून भारतीय रेल्वेने नॉन-पीक तासांमध्ये चेन्नई येथे उपनगरीय रेल्वेने प्रवास करण्यास सर्वसामान्यांना परवानगी दिली आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी ही माहिती दिली.

कोलकाता येथे  बंगाल केमिकल येथील स्थानिक परिसरात लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.

युके मध्ये कोरोनाचे नवे रुप आढळून आल्याने पंजाब सरकारकडून SOP जाहीर करण्यात आली आहे.

कोलकाता मधील बंगाल केमिकल येथील स्थानिक परिसरात भीषण आग, 15 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

तमिळनाडू येथे कोरोनाचे आणखी 1052 रुग्ण आढळले असून 17 जणांचा बळी गेला आहे.

कोरोना व्हायरसच्या परिस्थितीमुळे  हरियाणा येथे पहिली ते आठवीच्या वर्गाचे शिक्षण ऑनलाईन पद्धतीनेच सुरु राहणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे.

Load More

ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा (Coronavirus) नवा प्रकार आढळून आल्यामुळे जगभरातील सर्वच देशात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. परिणामी भारतासह अनेक देशांनी ब्रिटनवरुन येणाऱ्या सर्व विमानसेवा रोखण्याचा निर्णय घेतला आहे. सुदैवाने भारतात अद्याप कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आलेला नाही. मात्र, तरी देशात योग्य खबरदारी घेण्याची आवश्यकता असल्याचं एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी म्हटलं आहे.

नव्या कोरोना विषाणूमुळे ब्रिटनमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. कोरोना विषाणूच्या नव्या प्रकाराचा प्रादुर्भाव अत्यंत वेगाने होत असल्याचं ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी म्हटलं आहे. देशात आढळून आलेला कोरोना विषाणूचा नवा प्रकार एका देशातून दुसऱ्या देशात वेगाने पसरु शकतो, अशी शक्यतादेखील यावेळी जॉन्सन यांनी वर्तवली आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.

दरम्यान, शेतकरी आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्याने शिवसेना नेते संजय राऊत यांनी सामना अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. शिखांच्या शेतकरी आंदोलनाकडे पाठ फिरवून मोदी गुरुद्वारा रकीबगंज येथे पोहोचले तरी दिल्लीच्या सीमेवरील पंजाबचा शेतकरी विचलित झाला नाही. त्याचा संघर्ष, त्याचा लढा सुरूच राहिला. त्यामुळे रकीबगंज गुरुद्वारात मोदी गेले, हा त्यांच्या वैयक्तिक श्रद्धेचाच भाग मानावा, असं खोचक मत संजय राऊत यांनी अग्रलेखातून व्यक्त केलं आहे.