Mumbai Weather Update: भारतीय हवामान विभाग (IMD) ने आपल्या दैनंदिन हवामान अहवालात बुधवार, 15 मे रोजी मुंबईसाठी उष्णतेच्या लाटेच्या स्थितीचा अंदाज वर्तवला आहे. 'शहर आणि उपनगरात उष्णतेची लाट निर्माण होण्याची शक्यता आहे', असे आयएमडीने म्हटले आहे. हवामान संस्थेने असेही म्हटले आहे की, पुढील ४८ तासांत हलका पाऊस आणि मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. मुंबईत धुळीचे वादळ आणि पावसाच्या एका दिवसानंतर आयएमडीचा हवामान अहवाल आला आहे. ताज्या अंदाजानुसार, नुकत्याच झालेल्या पावसामुळे मुंबईत आज तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
अहवालानुसार, सांताक्रूझमध्ये 37°C पेक्षा जास्त आणि कल्याण व परिसरात 40°C पेक्षा जास्त तापमानासह तीव्र उष्णता अपेक्षित आहे. आजचा दिवस उष्ण आणि दमट असल्याने, भरपूर पाणी प्या आणि हायड्रेटेड रहा असा सल्ला देण्यात आला आहे. दुसरीकडे, गेल्या काही दिवसांत हवामानात अचानक झालेल्या बदलामुळे मुंबई, ठाणे आणि लगतच्या भागात वाढत्या तापमानापासून काहीसा दिलासा मिळाला. सोमवार, 13 मे रोजी, मुंबईत हवामानात बदल झाला, शहरातील बहुतांश भागात विजांचा कडकडाट, जोरदार पाऊस आणि धुळीचे वादळ जाणवत होते.
पहा पोस्ट-
Mumbaikars, done with cold & rain?
Get ready for heatwave 🔴 | 15 May ⚠️
As per the latest forecast, Mumbai is set to experience a sharp rise in temperatures today, following recent rains. The onset of intense heat, with temperatures potentially exceeding 37°C in Santacruz and… https://t.co/YLdFY6JBrv pic.twitter.com/2LMNRgiBOs
— Mumbai Rains (@rushikesh_agre_) May 15, 2024
अचानक झालेल्या हवामान बदलाचे मुंबईकरांनी स्वागत केले असतानाच मुंबईतील घाटकोपर परिसरात बेकायदेशीर होर्डिंग कोसळल्याने विध्वंसही झाला. होर्डिंग पडल्याने 14 जणांना जीव गमवावा लागला, एनडीआरएफच्या टीमने 74 जणांना वाचवले. सायंकाळी पाचच्या सुमारास होर्डिंग पडल्याचे सांगण्यात येत आहे. शहरात धुळीचे वादळ आणि मुसळधार पावसादरम्यान वाऱ्याचा वेग ताशी 60 किमीपर्यंत पोहोचला. मुंबईसाठी वादळ आणि पावसाचा इशारा व्यतिरिक्त, IMD ने पुढील पाच दिवस महाराष्ट्र आणि गोव्यात हवामानाचा अंदाज वर्तवला आहे.
आपल्या प्रादेशिक हवामान अंदाजानुसार, IMD ने म्हटले आहे की, कोकण आणि गोव्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.