Dry Day In Maharashtra: राज्यात तीन दिवस ड्राय डे; दारूची दुकाने राहणार बंद, नेमकं कारण काय?
Liquor | Image used for representational purpose | (Photo Credit: Wikimedia Commons)

Dry Day In Maharashtra : राज्य शासनाने तीन दिवस राज्यात मद्यविक्रीला बंदी (Liquor Shop Closed)घातली आहे. या आठवड्यात शनिवारपासून ते पुढील आठवड्यातील सोमवारपर्यंत राज्यात दारु(Alcohol)ची दुकानं बंद राहतील. लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या टप्प्यातील मतदान मुबंईत २० मे रोजी होत आहे. आर्थिक राजधानीत मतदान होत असल्याने 18 ते 20 मेपर्यंत राज्यात ड्राय डे ची घोषणा केली आहे. परिणामी मद्यप्रेमींच्या घशात दारू चा एक थेंबही तीन दिवस जाणार नसल्याचे चित्र आहे. (हेही वाचा: Sangrur Spurious Liquor Case: पंजाबमधील संगरूरमध्ये विषारी दारू प्यायल्याने 21 जणांचा मृत्यू, 40 जणांवर उपचार सुरू)

लोकसभा निवडणूक 2024 मधील २० रोजीचे मतदान राज्यातील शेवटच्या टप्प्यातील मतदान आहे. या काळात मुंबईसह परिसरात कोणत्याही प्रकारचा गोंढळ होऊ नये. त्यामुळे दारुची सर्व दुकाने, आस्थापना बंदी घालण्यात आली आहे. या काळात कोणीही दारू न पिता मतदान प्रक्रियेत सहभागी होण्याची अपेक्षा आहे. तर कोणताही अनुचीत प्रकार घडू नये यासाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे. (हेही वाचा:VAT on Liquor: हॉटेल, बार, लाउंज आणि क्लबमध्ये दिले जाणारे मद्य महागणार; महाराष्ट्र सरकारने दारूवरील व्हॅट वाढवला, 1 नोव्हेंबरपासून नवे दर लागू )

18 ते 20 मे पर्यंत  दुकाने राहणार बंद

मुंबई शहरात 18 मे रोजी संध्याकाळी 5 वाजेपासून दारुची दुकाने आणि बार बंद असतील. 19 मे रोजी संपूर्ण दिवसभर दारु विक्री बंद राहणार आहेत. तसेच, 20 मे रोजी संध्याकाळी 5 वाजेनंतर दुकाने उघडतील. म्हणजेच मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यावर दारूची दुकाने पुन्हा खुली होतील. याशिवाय 5 जून रोजी सुद्धा ड्राय डे जाहीर करण्यात आला आहे. राज्यासह संपूर्ण देशात, होळी, दिवाळी, गांधी जयंती, 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी रोजी अधिकृतरित्या ड्राय डे असतो. या दिवशी मद्यविक्री करण्यात येत नाही.