Nurse Replaced Fentanyl IV Bags With Water: नर्सने फेंटॅनाइल IV ऐवजी दिलं नळाचं पाणी; 10 रुग्णांचा मृत्यू
Fentanyl IV Bags (फोटो सौजन्य - X/@BillEaster10)

Nurse Replaced Fentanyl IV Bags With Water: अमेरिकेतील ओरेगॉन येथील हॉस्पिटलमधील एका नर्सने रूग्णांना दिलेल्या फेंटॅनाइल (Fentanyl) औषधांची चोरी करून त्याऐवजी रुग्णांना नळाचे पाणी दिले. यामुळे किमान 10 रुग्णांचा मृत्यू झाला. 'न्यूयॉर्क पोस्ट'मधील वृत्तानुसार, रुग्णालयात रुग्णांना दिल्या जाणाऱ्या औषधांच्या चोरीचा तपास पोलीस करत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉस्पिटलमध्ये संसर्गामुळे 9 ते 10 जणांचा मृत्यू झाला आहे.

रुग्णालयात रुग्णांना दिल्या जाणाऱ्या फेंटॅनाइल या वेदनाशामक औषधाची चोरी लपविण्यासाठी परिचारिकेने रुग्णांना नळाचे पाणी दिले. या रुग्णालयात मृत्युमुखी पडलेल्या दोघांच्या नातेवाईकांनी सांगितले की, रुग्णालय प्रशासनाने रुग्णांचा मृत्यू संसर्गामुळे झाल्याचं म्हटलं होतं. (हेही वाचा -Airplane window blows out Mid-Air: विमानाची खिडकी हवेतच उघडली, काय घडले पुढे? (Watch Video))

पोलिसांनी एका निवेदनात म्हटले आहे की, रुग्णांच्या सेवेवर याचा नकारात्मक परिणाम होत आहे. रुग्णांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. परंतु, याचा तपास करण्यात येत आहे. दुसरीकडे, रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी याबाबत खेद व्यक्त केला आहे. (हेही वाचा - Viral Video: कुत्र्याच्या पिल्लाला पाजली दारू, व्हिडिओ व्हायरल होताच सवाई माधोपूर पोलीस ठाण्यात कारवाई)

याबाबत आम्ही पोलिसांना कळवले असून आम्ही रुग्णांच्या मृत्यूचे नेमके कारण शोधत आहोत, असं एका रुग्णालय अधिकाऱ्यांने सांगितले आहे. ओरेगॉन आरोग्य प्राधिकरणाने पुष्टी केली आहे की, ते या अहवालाची चौकशी करत आहेत. या घटनेत अद्याप कोणाला अटक झाली आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.