अलास्का एअरलाईन्स (Alaska Airlines) कंपनीचे विमान आपत्कालीन स्थिती उद्भवल्याने पोर्टलँड आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Portland International Airport) शुक्रवारी रात्री तातडीने उतरविण्यात (Airplane Emergency Landing) आले. आकाशात असलेल्या विमानाची खिडकी अचानक उघडल्याने (Aeroplane’s Fuselage Missing) किंवा अचानक उडून गेल्याने ही आणीबाणी सदृ श्य स्थिती उद्भवली. सोशल मीडियावर या धक्कादायक प्रकाराच एक व्हिडिओ व्हायरल (Airplane Viral Video) झाला आहे. ज्यामध्ये घटनेचे गांभीर्य अधोरेखीत होते. अनेक प्रसारमाध्यमांनी हे व्हिडिओ प्रसिद्ध केले आहेत. ही घटना घडली तेव्हा विमानात प्रवासी मोठ्या संख्येने होते. ज्यांना श्वास कोंडणे, गुदमरणे, चक्कर येणे आणि इतर त्रास सुरु झाले. पायलटने प्रसंगावधान दाखवत तातडीने विमान लँड करण्याचा निर्णय घेतला आणि ते यशस्वी लँडही केले.
विमानाचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
KPTV ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, एका अज्ञात प्रवाशाने त्यांना या घटनेचे व्हिडिओ पाठवले आहेत. या प्रवशाला त्याची ओळख जाहीर करायची नाही. त्यामळे त्याचे नाव गुप्त ठेवण्यात आले आहे. दरम्यान, R A W S A L E R T S नेही आपल्या @rawsalerts या 'X' (पूर्वीचे ट्विटर) हँडलवरुन या घटनेचे व्हिडिओ शेअर केले आहेत. ज्यावर जगभरातील नेटीझन्सकडून प्रतिक्रिया येत आहेत. लेटेस्टली मराठी या व्हिडिओची पुष्टी करत नाही. (हेही वाचा, Air Asia Flight Emergency Landing: थोडक्यात बचावले 168 प्रवाशांचे प्राण, एअर एशियाच्या विमानाचे कोचीमध्ये करण्यात आले आपत्कालीन लँडिंग)
विमान कंपनीकडून घटनेची पुष्टी
दरम्यान, ही घटना शुक्रवारी सायंकाळी 7:26 वाजनेच्या (PST) सुमारास घडली. घटनेनंतर अलास्का एअरलाइन्सने 'X' हँडलवर वर पोस्ट करत म्हटले की, 'त्यांना त्यांच्या फ्लाइट AS1282 सोबत घडलेल्या घटनेची माहिती मिळाली आहे. मात्र, त्याबाबत अधिक तपशील मिळाल्यानंतर अधिक माहिती जाहीर करण्यात येईल'. (हेही वाचा, Mobile Blast in Air India Flight: टेकऑफ दरम्यान झाला मोबाईलचा स्फोट; एअर इंडियाच्या विमानाचे करण्यात आले आपत्कालीन लँडिंग)
हवेत झेपावल्यावर काहीच मिनिटांत विमानाचे आपत्कालीन लँडींग
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, प्रवाशांनी सांगितले की, हे विमान PDX वरून ओंटारियो, कॅलिफोर्नियाकडे निघाले होते. विमानाने पोर्टलँडवरुन 4:40 उड्डाण भरले. मिात्र, संध्याकाळी 5:30 च्या सुमारास हे विमान पोर्टलँडला एमरजन्सी लँडींग करण्यासाठी पुन्हा परतले. एका प्रवाशाने सांगितले की, विमानात काही प्रमाणात गोंधळ माजला होता. मात्र, यामध्ये कोणी जखमी झाले किंवा कोणाला इतर काही त्रास झाला किंवा नाही याबाबत माहिती मिळू शकली नाही.
व्हिडिओ
🚨#BREAKING: Alaska Airlines Forced to Make an Emergency Landing After Large Aircraft Window Blows Out Mid-Air ⁰⁰📌#Portland | #Oregon
⁰A Forced emergency landing was made of Alaska Airlines Flight 1282 at Portland International Airport on Friday night. The flight, traveling… pic.twitter.com/nt0FwmPALE
— R A W S A L E R T S (@rawsalerts) January 6, 2024
विमानातील प्रवाशांपैकी बहुतेकांनी त्यांची नावे सांगण्यास किंवा ओळख देण्यास नकार दर्शवला. त्यांनी KPTV शी बोलताना सांगितले की, विमानात आपत्कालीन स्थिती निर्माण झाल्यावर पुढच्या काहीच मनिटांमध्ये ते विमानतळावर उतरविण्यात आले. दरम्यान, काही प्रवाशांनी विमान लँड होईपर्यंत ऑक्सिजन मास्कचा वापर केला. दरम्यान, अधिक माहितीचा तपशील अद्याप येणे बाकी आहे. मात्र, घडल्या प्रकाराची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.